उल्हासनगरच्या गार्डनमध्ये गर्दुल्ल्याचा ब्लेड हल्ला, बालिका गंभीर जखमी

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात असलेल्या महापालिकेच्या बाल उद्यानात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. ( Druggist attack girl blade Ulhasnagar)

उल्हासनगरच्या गार्डनमध्ये गर्दुल्ल्याचा ब्लेड हल्ला, बालिका गंभीर जखमी
गर्दुल्ल्याचा चिमुकलीवर ब्लेड हल्ला
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:51 AM

उल्हासनगर : एका गर्दुल्ल्याने अल्पवयीन मुलीवर वार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेत बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या ठाण्यात उपचार सुरु आहेत. तर पोलीस गर्दुल्ल्याचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Druggist attack minor girl with blade in Ulhasnagar Children’s Garden)

ब्लेड हल्ल्यात बालिका गंभीर

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात असलेल्या महापालिकेच्या बाल उद्यानात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. या उद्यानात गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या हात, नाक, छाती आणि तोंडावर या गर्दुल्ल्याने ब्लेडने वार केले. त्यानंतर त्याने घटनास्थळाहून पोबारा केला. स्थानिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या या मुलीला उचलून मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र तिला गंभीर जखमा असल्याने ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांकडून गर्दुल्ल्याचा शोध

जखमी मुलीला आई वडील नसून ती चोपडा कोर्ट भागात नातेवाईकांकडे वास्तव्याला होती. मात्र ती घटनास्थळी नेमकी कशी गेली होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून या गर्दुल्ल्याचा पोलीस शोध घेत आहेत. याआधीही लोकल ट्रेनचे रिकामे डबे किंवा निर्जन रस्त्यांवर असे गर्दुल्ल्यांनी हल्ले केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र भरदिवसा लहान मुलांसोबत घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

मीरा रोडमध्येही गर्दुल्ल्यांचा ह्लला

नशा करायला बसलेल्यांना विरोध केला म्हणून दोन गर्दुल्लयांनी मीरा रोडमधील काही रहिवाशांवर तलवारीने वार करत मारहाण केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. यात 6 रहिवाशी जखमी झाले होता. मुंबईजवळच्या मीरा रोडमधील गीता नगरमधील फेज 8 मध्ये ही घटना घडली होती. या दोन्ही गर्दुल्लांना स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

संबंधित बातम्या :

पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला, हाताची बोटे फ्रॅक्चर

फटाके फोडत असताना रहिवाशांवर गर्दुल्ल्यांचा हल्ला, 6 जण जखमी

(Druggist attack minor girl with blade in Ulhasnagar Children’s Garden)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.