मद्यधुंद प्रेयसीचा हॉटेलपासून रुग्णालयापर्यंत तमाशा; प्रियकरांचं नेमकं काय व कुठे चुकले?
विशेष म्हणजे रुग्णालयात गेल्यानंतरही तिने प्रियकराला धक्काबुक्की केली. त्यामुळे मद्यधुंद प्रेयसीचा हा तमाशा सध्या सोशल मीडियातही बराच व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेश : प्रेमामध्ये सुरुवातीच्या ठराविक काळापर्यंत चांगला गोडवा असतो. प्रेम जसेजसे जुने होते, तसतसे नात्यामध्ये कटुता येते. प्रत्येक प्रेमसंबंधांमध्ये (Love Affair) असा कटू अनुभव नसेलही. पण बहुतांश प्रेमसंबंधांमध्ये याची प्रचिती येते. अशाच एका घटनेत प्रेयसीने मद्यधुंद होत प्रियकराविरोधात एका हॉटेलमध्ये प्रचंड राडा घातला. क्षुल्लक कारणावरून झालेला वाद (Minor Dispute) रक्तरंजित बनला. प्रेयसीचा हात रक्तबंबाळ झाला. त्यामुळे तिला वेळीच वैद्यकीय उपचार (Treatment) देण्यासाठी हॉटेलपासून रुग्णालयापर्यंत धावाधाव झाली.
विशेष म्हणजे रुग्णालयात गेल्यानंतरही तिने प्रियकराला धक्काबुक्की केली. त्यामुळे मद्यधुंद प्रेयसीचा हा तमाशा सध्या सोशल मीडियातही बराच व्हायरल झाला आहे.
हॉटेलमध्येच प्रेयसीचा धिंगाणा
अलीगडच्या ठाणा गांधी परिसरातील रोडवेज बस स्टॉप जवळील रुबी हॉटेलमध्ये मध्यरात्री प्रेयसीने धिंगाणा घातला. तिने प्रियकरासमोरच आपल्या हाताची नस कापली. प्रियकराने प्रेयसीकडून अशा प्रकारचा धिंगाणा घातला जाईल, अशी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
हॉटेलमध्ये प्रियकराला भेटण्यासाठी आली होती तरुणी
छोट्याशा कारणावरून वाद झाला आणि मद्यधुंद प्रेयसी भलतीच चवताळली. मध्यरात्र झालीय याचा विचार न करताच तिने धिंगाणा घालत अख्खं हॉटेल डोक्यावर घेतले. ही महिला मूळची इंदूर येथील रहिवासी आहे. ती हॉटेलमध्ये आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आली होती.
दोघांनीही मद्यप्राशन केले होते. सुरुवातीला प्रेमाच्या आणाभाका झाल्या मात्र नंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. हे भांडण काही क्षणांतच चांगलेच भडकले आणि मद्यधुंद प्रेयसीने आपल्या हाताची नस कापून घेतली.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिली पोलिसांना खबर
प्रियकरासोबत वाद झाल्यानंतर मद्यधुंद प्रेयसी जोरजोरात ओरडतच हॉटेलच्या रूममधून बाहेर पडली होती. दोघांमधील भांडण टोकाला गेल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये धाव घेतली आणि जखमी प्रेयसीला मलखान सिंह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिचा प्रियकरही सोबत होता.
रुग्णालयातही जोडप्याचा वाद
विशेष म्हणजे रुग्णालयामध्येही ती महिला आणि तिच्या प्रियकराचा वाद सुरूच होता. प्रियकर साथ सोडून चालला होता, असा आरोप त्या महिलेने पोलिसांपुढे केला. यावेळी प्रियकर महिलेला समजावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ती महिला ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हती.
उलट त्या महिलेने रुग्णालयामध्ये देखील प्रियकराला मारझोड करणे सुरू ठेवले. हा सगळा प्रकार पाहून पोलिसांनाही मोठा धक्काच बसला.
