AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूच्या नशेत तो मुलाला मारत होता, वाचवायला आलेल्या वृद्ध वडीलांनाही नाही सोडले…

मद्यपी मुलाने वयोवृद्ध पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र त्याने हे कृत्य का केले, हे ऐकून सर्वच हैराण झाले आहेत.

दारूच्या नशेत तो मुलाला मारत होता, वाचवायला आलेल्या वृद्ध वडीलांनाही नाही सोडले...
पुण्यात नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला
| Updated on: Jul 10, 2023 | 12:20 PM
Share

रांची : घरगुती वादातून मद्यपी मुलाने त्याच्या वयोवृद्ध वडिलांची (drunk man killed own father) हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून मुलाने वडिलांच्या डोक्यात रॉड घालून त्यांचा जीव (crime news) घेतला. टंडवा ठाणे क्षेत्रातील तेलियाडीह गावात हा प्रकार घडला. या हल्ल्यानंतर त्या वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी मुलगा फरार झाला. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. काली भुईया असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काली यांचा मुलगा मुन्नी भुईया (३५ वर्षे) हा मद्यधुंद अवस्थेत आपल्या मुलाला मारहाण करत होता. ते थांबवण्यासाठी व नातवाला वाचवण्यासाठी काली हे मध्ये पडले. मात्र यामुळे मुन्नी आणखीनच संतापला आणि रागाच्या भारात काहीही विचार न करता त्याने वडिलांच्या डोक्यात रॉड मारला. हा हल्ला इतका जोरदार होता की काली हे गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच घटनास्थळीचे त्यांचे प्राण गेले.

या हल्ल्याचा व घटनेला लेखी अर्ज मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र काली यांच्या मृत्यूमुळे घरात शोकाकुल वातावरण असून रडून रडून नातेवाइकांची दुरावस्था झाली आहे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल