दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी ईडीची हैदराबादमध्ये छापेमारी, आरोपीचे अनेक बड्या नेत्याशी संबंध

श्रीनिवास राव यांच्याबाबत ईडीकडे त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या आधारे त्यांच्या घर-कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी ईडीची हैदराबादमध्ये छापेमारी, आरोपीचे अनेक बड्या नेत्याशी संबंध
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी ईडीची हैदराबादमध्ये छापेमारी
Image Credit source: Google
| Updated on: Sep 19, 2022 | 11:29 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळा (Liquor scam) प्रकरण आता हैदराबादपर्यंत पोहचले आहे. ईडीने आता हैदराबादमध्ये तपास सुरु केला आहे. हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी ईडीने छापे (ED Raid) टाकले आहेत. हैदराबादमध्ये श्रीनिवास राव (Srinivas Rao) आणि त्यांच्या कंपनीच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. राव यांचे अनेक बड्या नेत्यांशी संपर्क असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे नेते कोण आहेत, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

सीबीआयने निश्चितपणे आपल्या एफआयआरमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मुख्य आरोपी मानले आहे. सिसोदिया यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.

आर्थिक व्यवहार उघडकीस आल्याने ईडीचा प्रवेश

आता आर्थिक व्यवहाराचे प्रकरणही उघड झाल्याने ईडीही तपासात गुंतली आहे. आता ईडीचा तपास दिल्लीबाहेर हैदराबादपर्यंत पोहोचला आहे. हैदराबादमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचा या घोटाळ्याशी थेट संबंध असल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीनिवास राव यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा

श्रीनिवास राव यांच्याबाबत ईडीकडे त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या आधारे त्यांच्या घर-कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.

याआधी सहा राज्यात ईडीची छापेमारी

ईडीने यापूर्वी 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकरणात सीबीआयला मनी लाँड्रिंगचा संशय आल्यापासून ईडीची भूमिकाही वाढली आणि त्यांची या प्रकरणात सक्रियताही लक्षणीय वाढली.

दारू घोटाळ्यात सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा तपास एकाच वेळी सुरू आहे.

अरविंद केजरीवालांचे शैक्षणिक काम थांबवण्याचा प्रयत्न

या छाप्यांबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सीबीआयने छापे टाकले होते. काहीही सापडले नाही. आता ईडी छापे टाकणार. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

देशात जे शिक्षणाचे वातावरण आहे, अरविंद केजरीवाल जे काम करत आहेत ते बंद पाडण्याचे काम सुरू आहे. पण ते थांबवू शकत नाहीत. सीबीआयचा वापर करा, ईडी वापर करा, शिक्षणाचे काम थांबवता येणार नाही. माझ्याकडे फारशी माहिती नाही. मी प्रामाणिकपणे काम केले आहे, असेही सिसोदीया म्हणाले.