AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीच्या वादातून कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न, महिलेने वेळीच प्रसंगावधान राखले अन्…

दिपाली यांच्या आरोपानुसार योगेश आणि मांडा गावातील लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू आहेत.

जमिनीच्या वादातून कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न, महिलेने वेळीच प्रसंगावधान राखले अन्...
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Sep 19, 2022 | 10:54 PM
Share

कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळ्याजवळ असलेल्या वासुंद्री गावात जळीतकांडाचा भयानक प्रकार घडला. वासुंद्री रोडला असलेल्या नारायण निवासमध्ये राहणाऱ्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलींना घरात बंदिस्त करुन तिच्या घरावर पेट्रोल (Petrol) ओतून त्यांना घरात जिवंत जाळण्या (Burn Live)चा प्रकार बुधवारी रात्री घडला. या घराच्या आजूबाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांना हल्लेखोरांनी कड्या लावल्या होत्या. त्यामुळे हे सर्व रहिवासी घरात कोंडून राहिले होते. मात्र तरीही या महिलेने प्रसंगावधान राखून आपल्या मुलींसह स्वतःचा बचाव (Rescue) केला.

रात्री दीड वाजता घराला लावली आग

या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेने बंदिस्त घरातून ओरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी रात्री दीड वाजता जागे झाले. त्यांना योगेश पाटील यांच्या घराला आणि घरासमोरील रिक्षाला आग लागल्याचे लक्षात आले.

शेजारील रहिवाशांनी वाचवले प्राण

रहिवाशांनी घराच्या दरवाजाला बाहेरुन लावलेली कडी काढून महिलेसह तिच्या दोन्ही मुलींना सुखरुप बाहेर काढले. मात्र तत्पूर्वी ही महिला आणि तिच्या आठ आणि दोन वर्षाच्या मुली धुराने कोंडून गुदमरल्या होत्या.

शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरुन कड्या लावण्यात आल्याने तेही रहिवासी घराबाहेर पडणार नाहीत, अशी व्यवस्था हल्लेखोरांनी केली होती.

महिलेचा पती रात्रपाळीला गेला होता

कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळ्याजवळ असलेल्या वासुंद्री गावात राहणारे योगेश पाटील हे टिटवाळ्यातील वासुंद्री रोडला असलेल्या नारायण निवासमध्ये पत्नी दीपाली आणि दोन मुलींसह राहतात. योगेश हे शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरी करतात.

बुधवारी योगेश रात्रपाळीला कामावर गेले होते. घरी पत्नी व दोन लहान मुलीच होत्या. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या खिडकीजवळ बोलण्याचा आवाज आला. त्यावेळी योगेश यांची पत्नी दीपाली हिने प्रसंगावधान राखून घरातील लाईट बंद केल्या.

जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याचा महिलेचा आरोप

दिपाली यांच्या आरोपानुसार योगेश आणि मांडा गावातील लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू आहेत. आठ वर्षांपूर्वी पाटील बंधूंनी योगेशला मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे.

तेच आरोपी खिडकीतून हातात ड्रम, बोळे घेऊन पळताना दीपाली हिने पाहिले. आरोपींनी जमिनीच्या वादातून योगेश यांच्यावर राग काढण्यासाठी घरावर पेट्रोल टाकून त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिपालीने सांगितले.

घराबाहेर उभी असलेला रिक्षाही जाळली

घराच्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षाला रॉकेल टाकून आग लावली. घरातून दिपाली हिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दिपाली आणि तिच्या मुलींना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दिपाली आणि तिच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून योगेश पाटील यांच्या जबानीवरून भादंवि कलम 440, 34 अन्वये गुन्हा दाखल केला.

आगीत 65 हजाराचे सामान जळू खाक

या आगीत घरातील सोफा, पडदे, वायर, 2 फॅन, लाईट्स, बोर्ड, टीव्हीसह रिक्षा असे 65 हजार रुपये किंमतीचे सामान जळून खाक झाले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप देशमुख अधिक तपास करत आहेत.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....