VIDEO | सोनसाखळी चोरीसाठी हल्ला, आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेले…

गीताने प्रतिकार करत गळ्यातील चेन आणखी घट्ट पकडली. त्यामुळे दोघांमध्ये काहीशी झटापट झाली. (Pregnant woman robbed of gold chain)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:34 AM, 14 Apr 2021
VIDEO | सोनसाखळी चोरीसाठी हल्ला, आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेले...
चेन्नईत सोनसाखळी चोरांचा गर्भवतीवर हल्ला

चेन्नई : सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने गर्भवतीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर पूजा करणाऱ्या आठ महिन्यांच्या गरोदर तरुणीची भरदिवसा भररस्त्यात सोनसाखळी चोरण्यात आली. प्रतिकार केल्यामुळे चोरांनी तिला रस्त्यावर फरपटत नेले. चेन्नईतील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Eight Months Pregnant woman attacked robbed of gold chain in Chennai)

घरासमोर देवपूजा करताना हल्ला

पल्लवरम शहरातील रेणुका नगर भागात राहणारी 25 वर्षीय गीता आठ महिन्यांची गर्भवती आहे. शुक्रवारी सकाळी ती घरासमोर असलेल्या देवाची नित्यनेमाने पूजा करत होती. ती डोळे बंद करुन देवाची प्रार्थना करत होती. त्याचवेळी दोघे दुचाकीस्वार मुख्य रस्त्यावर येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेला तरुण तिच्याकडे गेला. गीता बेसावध अवस्थेत असतानाच त्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली.

प्रतिकारानंतर महिलेची चोराशी झटापट

गीताने प्रतिकार करत गळ्यातील चेन आणखी घट्ट पकडली. त्यामुळे दोघांमध्ये काहीशी झटापट झाली. तिचा प्रतिकार सुरुच असल्यामुळे हल्लेखोराने तिला खेचत रस्त्यापर्यंत नेले. या झटापटीत गीता खाली पडली, तरी त्याने तिला फरफटत नेले. अखेर तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात हल्लेखोर यशस्वी झाला. त्यानंतर दोन्ही दुचाकीस्वार आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेत गीताला दुखापत झाली आहे.

गीताचा पती रामचंद्रनने पल्लवरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोमवारी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींना आम्ही लगेच अटक करु, असं आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलं आहे. (Eight Months Pregnant woman attacked robbed of gold chain in Chennai)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

वकिलाकडून अपहरण, सुटकेसाठी अशिलाचा मॉलमधून फोन, नवी मुंबईत किडनॅपिंगचा थरार

55 लाखांच्या सुपारीने तृतीयपंथीयाची हत्या, एकता जोशी हत्याकांडाचं गूढ सात महिन्यांनी उलगडलं

(Eight Months Pregnant woman attacked robbed of gold chain in Chennai)