Virar Crime : अनोळखी कॉल उचलताय सावधान…! स्क्रिन शॉट काढून ते एडिट करत पैशासाठी धमकावणारी टोळी सक्रिय

बलोच यांनी वेळीच खबरदारी घेत विरार पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या सर्व प्रकारची माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील सायबर क्राईम ब्रँचला ही याची कल्पना दिली.

Virar Crime : अनोळखी कॉल उचलताय सावधान...! स्क्रिन शॉट काढून ते एडिट करत पैशासाठी धमकावणारी टोळी सक्रिय
स्क्रिन शॉट काढून ते एडिट करत पैशासाठी धमकावणारी टोळी सक्रिय Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 5:28 PM

विरार : अनोळखी व्हिडीओ कॉल उचलत असाल तर सावधान व्हा… सध्या व्हिडीओ कॉल (Video Call) करून, कॉल उचलताच त्याचे स्क्रिन शॉट (Screen Shot) काढून ते एडिट करून, सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत आर्थिक ब्लॅकमेल (Blackmail) करणारी टोळी सक्रिय झाली आहे. विरारमधील सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांना 24 जुलै रोजी मध्ये रात्रीच्या सुमारास एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यांनी तो रिसिव्ह केला असता त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी बलोच यांनी विरार पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तसेच सायबर क्राईम ब्रांचलाही याबाबत माहिती दिली. सायबर पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत पैशाची मागणी

बलोच यांना एका अनोळखी नंबरवरुन व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल आला होता. बलोच यांनी कॉल उचलला असता समोरुन एक महिला अर्धनग्न अवस्थेत बलोच यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती. हे पाहताच त्यांनी कॉल कट केला आणि सदर नंबर ब्लॉक केला. मात्र थोड्या वेळाने बलोच यांना दुसऱ्या नंबरवरुन एक व्हिडिओ पाठवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये मुनाफ बलोच यांचा चेहरा एका पुरुषाला लावून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. व्हिडिओ सोशल मीडियावर न टाकण्यासाठी 7 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्युब, सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू केली होती.

सायबर क्राईमकडून तपास सुरु

बलोच यांनी वेळीच खबरदारी घेत विरार पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या सर्व प्रकारची माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील सायबर क्राईम ब्रँचला ही याची कल्पना दिली. आता सायबर क्राईम ब्रँच या सर्व घटनेचा सखोल तपास करत आहे. जर आपणही अनोळखी कॉल उचलत असाल तर सावधगिरी बाळगणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा तुमची देखील फसवणूक होऊ शकते हेच या घटनेवरून समोर येत आहे. (Extortion gang active for money by taking screen shot and editing)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.