दादर स्टेशनवर पोलिसांनी बॅग नसती उघडली तर मर्डर प्रकरण समोर नसतं आलं, रूक्सानाच्या प्रेमासाठी त्याने…

विवाहबाह्य प्रेमसंबंधांची अनेक प्रकरण समोर येताना दिसत आहेत. मुंबईमधील दादर स्टेशनवर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका खूनाचा उलगडा झाला आहे. चित्रपटाच्या कथेला लाजवेल असं प्रकरण समोर आलं आहे.

दादर स्टेशनवर पोलिसांनी बॅग नसती उघडली तर मर्डर प्रकरण समोर नसतं आलं, रूक्सानाच्या प्रेमासाठी त्याने...
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 7:15 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील कायम माणसांनी गजबजलेल्या दादर स्टेशनवर एक धक्कादायक घटना समोर आली होती. दादर स्टेशनवर पोलिसांना एक तरूण संशयास्पद बॅग घेऊन चालला असल्याचं दिसून आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्या तरूणाला हटकलं आणि बॅग उघडायला लावली. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला कारण त्या बॅगमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह असल्याचं दिसून आला. पोलिसांनी संबंधित तरूणाला ताब्यात घेतलं खरं पण तो मुकबधीर असल्याने त्याची चौकशी करताना अडचणी येत होत्या. पण मुंबई पोलीस दलातील हवालदार राजेश सातपुते यांच्या मुलाने सांकेतिक भाषेतून सर्व माहिती घेत पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यास मदत केली.

नेमकं काय होतं प्रकरण?

दादरवर बॅगमध्ये सापडलेला मृतदेह अर्शद अली सादीक शेख (वय 30) याचा होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी जय प्रवीण चावडा आणि त्याचा साथीदार शिवजीत कुमार सिंह यांना अटक केली होती. मतृ अर्शद याची पत्नी रुक्साना हिचे आरोपी जय चावडा हिच्यासोबतच विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. रूक्साना आणि जय यांनी हत्या करण्याचा कट रचला होता. यामध्ये रूक्साना हीसुद्धा दिव्यांग आहे.

जय चावडा याने अर्शद याला दारू पिण्यासाठी पायधुनी येथे बोलावले होते. दारू पाजून शिवजीत सिंग याच्या मदतीने अर्शद याची हत्या केली. हातोड्याने वार करून दोघांना ठार मारले त्यानंतर त्यांनी अर्शदचा मृतदेह एका बॅगमध्ये भरला. दादर स्टेशनल पोहोचले आणि प्लॅट फॉम 11 वरून तुतारी एक्सप्रेसने ते पळून जाणार होते. मात्र बॅग जड असल्याने जय चावडा याला ती झेपत नव्हती. पोलिसांना संशय आला आणि त्यांना बॅग उघडायला लावली. त्यावेळी तिथून शिवजीत याने पळ काढलेला पण त्याला उल्हानगर येथून पळ काढला.

हत्या करणाऱ्या मूकबधिर आरोपीकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांना अडचण येत होती. मुंबई पोलीस दलातील हवालदार राजेश सातपुते यांच्या मूकबधिर मुलाने कमाल केली. आरोपी मूकबधिर असल्याने त्याच्या चौकशीत येणारी अडचण हवालदाराच्या मुलामुळे झाली सोपी. दादर स्थानकात सुटकेसमधून मृतदेह घेऊन जाणाऱ्या जय चावडा या मूकबधिर आरोपीकडून माहिती घेण्यासाठी हवालदाराच्या मुलाची मोलाची मदत झाली. गौरव सातपुते हा मूकबधिर असून तो सांकेतिक भाषा जाणतो. आरोपी मूकबधीर असल्याने त्याची चौकशी करताना सांकेतिक भाषा समजून घेणारा व्यक्ती पोलिसांना हवा होता. यावेळी मध्यरात्री राजेश सातपुते यांचा मूकबधिर मुलगा गौरव सातपुते याला आरोपीसमोर बसवून सांकेतीक भाषेतून त्याच्याकडून माहिती पोलिसांनी घेतली. या सांकेतिक भाषेमुळे पोलिसांना मिळालेल्या महत्वाच्या माहितीने गुन्ह्याची उकल झाली आणि आणखी दोन आरोपीनं पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.