AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मुलांची आई प्रेमात आंधळी, प्रियकरासोबत असतानाच आला पती, पण ते सत्य समोर येताच सर्वांची बोबडी वळली, मग पुढे झाले काय…

Extra marital Affair : पत्नी प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती. पतीने तिला अनेकदा समजावून ही त्याचा काही उपयोग झाला नाही. एका रात्री दोन वाजता पती उठला आणि त्याने तिला प्रियकरासोबत पाहिले. मग पुढे जे झाले...

दोन मुलांची आई प्रेमात आंधळी, प्रियकरासोबत असतानाच आला पती, पण ते सत्य समोर येताच सर्वांची बोबडी वळली, मग पुढे झाले काय...
ते सत्य समजताच सर्वांना धक्काImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 27, 2025 | 5:50 PM
Share

पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांना दोन मुलं होती. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण सोशल मीडियाच्या या युगात कुणाचा मनावरील ताबा केव्हा सुटेल हे सांगता येत नाही. या प्रकरणातही झाले तसेच दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झाली. पतीने पत्नीला समजावून सांगितले. पण ती तर प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती. एका रात्री तो दोन वाजता उठला. तेव्हा पत्नी शेजारी दिसली नाही. तो हॉलमध्ये आला तेव्हा त्याचा संशय खरा ठरला. पत्नी प्रियकरासोबत त्याला दिसली आणि मग पुढे हायहोल्टेज ड्रामा झाला.

मग बोलावले पोलीस

उत्तर प्रदेशातील अमेठी पोलीस ठाण्यातंर्गत ही घटना घडली. या भागातील एका घरात उत्तर रात्री एका घरात मोठा तमाशा झाला. पती रात्री दोन वाजता उठला असता त्याला पत्नी जवळ दिसली नाही. त्याने अंदाज घेतला. तो पुढच्या हॉलमध्ये आला असता, त्याची बायको शेजारच्या तरुणासोबत त्याला दिसली. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने दोघांना शिव्या घातल्या. दोघे आपल्याला मारून टाकतील या भीतीने त्याने दरवाजा बंद करत पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलावले. त्याने शेजार्‍यांना सुद्धा रात्री कॉल करून बोलावले. रात्री एकच गजहब उडाला.

शेजाऱ्यांनी गर्दी केली. तितक्यात पोलीस आल्यानंतर पतीने घराचा दरवाजा उघडला. एकच चर्चा सुरू झाली. पोलीसांनी परिस्थिती पाहता तिघांना जीपमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेले. तिथे चर्चा झाली. पत्नीने तिचे शेजाऱ्याच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. तसेच ती पतीच्या नकळत रात्री-अपरात्री त्याला भेटत असल्याचे मान्य केले. इतकेच नाही तर प्रियकरामुळे तिला गर्भधारणा पण झाल्याचे तिने सांगितले. हे कळताच सगळ्यांना एकदम झटका बसला.

मग पुढे झाले काय

पत्नी, प्रियकरापासून गर्भवती असल्याचे समोर येताच पती मटकन खाली बसला. दोघात काही समेट घडेल याची सर्व शक्यता संपून गेल्या. पतीने तात्काळ पत्नीला सोडण्याचा निश्चय जाहीर केला. पतीने पत्नीला घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. शेजार्‍यांनी सुद्धा त्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. त्यानंतर पत्नी प्रियकरासोबत गेली. पतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईलचा अति वापर आणि नात्यातील संवाद हरवल्याने असे प्रकार वाढत असल्याचे म्हटले आहे.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.