अरे हा साप की सैतान, त्याने धरला पिच्छा, 15 दिवसांत असा केला कार्यक्रम
Snake Bite : या सापाने कहर केला. एका जोडप्याचे ते सतत मागे लागले. जणू काही या जोडप्याची आणि त्याचे शत्रुत्व आहे. सापाने पिच्छा धरल्याने हे जोडपे भीतीच्या छायेखाली जगत होते. पण नंतर जे व्हायचे नाही तेच घडले.

या सापाने कहर केला. त्याच्या दहशतीमुळे जोडप्याचे जगणं मुश्किल झाले. हा साप सतत या जोडप्याचा पिच्छा करायच्या. त्यांचा पाठलाग करायचा. गेल्या 15 दिवसांत या सापाने या जोडप्याचा सतत पाठलाग केला. हे जोडपे दुसर्या गावाला गेले तिथे पण सापाने पिच्छा केला. सापानं 15 दिवसापूर्वी पत्नीला चावा घेतला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घरात दु:खाचे सावट
उत्तर प्रदेशातील फर्रूखाबाद येथील ही घटना आहे. 12 एप्रिल रोजी सकाळी अनुज कुमार आणि त्यांचे कुटुंबिय घरातच होते. त्याची पत्नी सुहानी ही घरातच एका बॉक्समधून सामान काढत होती. त्यावेळी तिच्या मागे तोच साप होता. त्याने तिला दंश दिला. ती ओरडताच सर्व तिच्याजवळ धावले. डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. पण तिची तब्येत अजून बिघडल्याने तिला सैफई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. अनुज या घटनेने खचून गेला होता. राहून राहून तो साप त्याच्या डोळ्यासमोर येत होता. या सापाची त्याला कोण धास्ती वाटत होती. त्याने याविषयी त्याच्या कुटुंबियांना सुद्धा सांगितले.
सापाने मग टार्गेट ठरवले
सुहानी गेल्याने अनुज खचला होता. दोन-तीन दिवस नातेवाईकांकडे गेला होता. पण त्याला तो साप आपला पिच्छा करत असल्याचे भासत होते. त्याने याविषयी कुटुंबियांना पण माहिती दिली. तो गावी परतला. शुक्रवारी संध्याकाळी तो शेतात गेला. एका ठिकाणी बसला. त्यावेळी सापाने त्याला कडाडून चावा घेतला. सुहानीला चावणार हाच तो साप होता असे अनुज ओरडत होता. त्याचे ओरडणे ऐकून शेतातील मंडळी धावली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तो अजून धोक्यातून बाहेर आलेला नाही.
गावात चर्चेला उधाण
चार वर्षांपूर्वीच अनुज आणि सुहानी यांचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला 9 महिन्यांची मुलगी आहे. तिच्या आईला या सापाने हिरावले. आता तिच्या वडिलांवर सुद्धा सापाने हल्ला केला. अनुजची तब्येत अजून नाजूक आहे. अनुजच्या मते हा साप गेल्या 15 दिवसांपासून त्याचा पाठलाग करत असल्याचा त्याला भास होत होता. पण त्याने मनाचा भ्रम म्हणून दुर्लक्ष केले. अनुजला त्याच्या 9 महिन्यांच्या मुलीची चिंता लागलेली आहे घरातील मंडळी देवाकडे त्याला वाचवण्यासाठी धावा करत आहे. आता हा योगायोग आहे की अंधश्रद्धा याची चर्चा गावात रंगली आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख माहिती आधारे देण्यात आला आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. टीव्ही ९ अशा कोणत्याही दाव्याला दुजोरा देत नाही.