मै LG बोल रहा हूँ…. दिल्लीत उपराज्यपालांच्या नावानं फोन… पुढे काय घडलं?

तपास केला असता हा कॉल ब्रिटनमधील एका नंबरवरून आल्याचं कळलं. सहाय्यक प्रोफेसरची बहीण आणि त्यांच्या वडिलांनादेखील याच नंबरवरून कॉल आल्याचं कळलं.

मै LG बोल रहा हूँ.... दिल्लीत उपराज्यपालांच्या नावानं फोन... पुढे काय घडलं?
पतीच्या कॉलनंतर महिलेची आत्महत्याImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 10:10 AM

नवी दिल्लीः मी दिल्लीचा LG बोलतोय. उपराज्यपाल बोलतोय… अशी ओळख दिल्लीतल्या (Delhi) एका असिस्टंट प्रोफेसरने (Assistant Professor) दिली. तेसुद्धा त्याच विद्यापीठाच्या कुलगुरुंना, जिथे ते शिकवतात. विषय होता, त्यांच्या बहिणीला सरकारी नोकरी लावण्याचा. असिस्टंट प्रोफेसरला आपल्याच विद्यापीठात (University) बहिणीला शिक्षकाची नोकरी लावायची होती. तिच्या नावाची शिफारस करायची होती. त्यासाठी त्यानं ही युक्ती केली. पण त्याच्याच जाळ्यात तो पुरता अडकला. नेमकी कोणती चूक त्याला नडली?

दिल्ली पोलिसांनी या असिस्टंट प्रोफेसरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपासही सुरु केलाय. गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे असिस्टंट प्रोफेसर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मी उपराज्यपाल विनय सक्सेना बोलतोय, अशी ओळख त्याने दिली. शिक्षक पदासाठी बहिणीच्या नावाची कथित शिफारस केली. एलजी सचिवालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.

आता हा आरोपी कसा पकडला गेला, हेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. 30 सप्टेंबर रोजी इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे कुलगुरू महेश वर्मा यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी दिल्लीचा उपराज्यपाल बोलतोय… असं म्हणत त्याने विद्यापीठातील इंग्रजी विभागात एक शिक्षक नियुक्त करण्याची शिफारस केली.

पण कुलगुरुंना संशय आला. त्यांनी फोन कॉलचा फॅक्टचेक करण्यासाठी एलजी सचिवालयाशी संपर्क केला. तेव्हा कळलं ती दिल्ली LG कडून असा कुणालाही कॉल करण्यात आला नाही.

तपास केला असता हा कॉल ब्रिटनमधील एका नंबरवरून आल्याचं कळलं. सहाय्यक प्रोफेसरची बहीण आणि त्यांच्या वडिलांनादेखील याच नंबरवरून कॉल आल्याचं कळलं.

दोघांचीही चौकशी झाली. त्यांनी 27 ऑगस्ट रोजी ब्रिटनला गेलेल्या सहाय्यक प्रोफेसरचं नाव घेतलं. आता आरोपी सहाय्यक प्रोफेसर यांच्याविरोधात लुक आउट सर्कुलर जारी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 2 ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल झाला. त्यानंतर नियुक्तीची प्रक्रियाही थांबवण्यात आली. हे प्रोफेसर इंद्रप्रस्थ विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात शिकवत होते, असं तपासाअंती निष्पन्न झालंय.

Non Stop LIVE Update
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.