AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव! विचित्रात अपघातात बस पेटली, मृत्यूचा आकडा वाढताच…व्हिडिओ

नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली आहे. बसने आणखी एका बसला धडक दिली असून दुचाकीस्वरांना देखील चिरडल्याची बाब समोर आली आहे.

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव! विचित्रात अपघातात बस पेटली, मृत्यूचा आकडा वाढताच...व्हिडिओ
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 08, 2022 | 1:42 PM
Share

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसचा समावेश आहे. यातील एका बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चार ते पाच दुचाकीस्वरांना चिरडून या बसचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात होरपळून आत्तापर्यन्त तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दोघे गंभीर जखमी आहेत. जखमी प्रवाशांसह इतर सर्व सुरक्षित प्रवाशांना देखील नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने नाशिकमध्ये मिर्ची हॉटेल परिसरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिर्ची हॉटेल परिसरात देखील तेरा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर देखील सलग वाहनांना आग लागळ्याच्या घटना समोर आल्या होत्या मात्र जीवित हानी झालेली नव्हती. मात्र, आजच्या दिवशी लागलेल्या आगीत पुन्हा जीवित हानी झाल्याने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये पुन्हा बसला आग लागून त्यात प्रवाशांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली आहे. बसने आणखी एका बसला धडक दिली असून दुचाकीस्वरांना देखील चिरडल्याची बाब समोर आली आहे.

एकूणच या अपघाताच्या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी होऊ लागली आहे. वारंवार राज्य सरकारच्या बसला आग लागळ्याच्या घटना समोर येत असल्याने याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशीही मागणी होत आहे/

नाशिकमध्ये देखील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर शहरातील ब्लॅक स्पॉट ठरवून तिथे तात्काळ कारवाई कारवाई सुरू झाली होती.

तशीच मागणी पुन्हा होऊ लागली आहे. महामार्गावरील ज्या ठिकाणी अपघाताची ठिकाणे ओळखून तिथे योग ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.