Video: बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; वडिलांचा मृत्यू, मुलगा बचावला;विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील घटना

उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराजसह विठ्ठलवाडी स्थानकात आले, यावेळी विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर प्रमोद यांनी मुला सह उडी मारली.

Video: बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; वडिलांचा मृत्यू, मुलगा बचावला;विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील घटना
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:33 PM

मुंबईः मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेससमोर (Deccan Express) आपल्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे (Railways) स्थानकात घडली. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा या अपघातातून सुखरूप बचावला आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे पोलिसांनी या मुलाला आईच्या ताब्यात देत वडिलांचा मृतदेह झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुलासह रेल्वखाली उडी मारण्याचा हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करु शकतो.

उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराजसह आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकात पोहचले होते. विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर प्रमोद यांनी मुला सह उडी मारली. प्रमोद यांनी रेल्वेखाली उडी मारताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वराज ट्रॅकमधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावला.

प्रमोद बेस्टमध्ये चालक

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्वराजला बाहेर काढले, तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. उल्हासनगरच्या शांती नगर परिसरात प्रमोद आंधळे आपली पत्नी मुलगा आणि मुलीसह राहत होते. प्रमोद बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .

आत्महत्येच्या कारणांचा शोध

प्रमोद आंधळे यांनी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते नोकरीला असताना आपल्या मुलासह त्यांनी रेल्वेखाली उडी मारून का आत्महत्या केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता मुलगा वाचला असून प्रमोद यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या

ठाणे पोलिसांनी जप्त केल्या दहा बंदुकासोबत अकरा काडतुसे; 52 हजारांचा ऐवज हस्तगत

औरंगाबादः शेतकऱ्यांना लुटणाऱ्या 30-30 घोटाळ्याच्या सूत्रधाराचा जामीन नामंजूर, सत्र न्यायालयाचा निकाल

Watch Video |पुण्यात अल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.