AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Firing : राजधानी दिल्लीत व्यावसायिकावर गोळीबार; गोळ्या झाडून हल्लेखोर फरार

दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यावसायिकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. यादरम्यान हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळावरून धूम ठोकली.

Delhi Firing : राजधानी दिल्लीत व्यावसायिकावर गोळीबार; गोळ्या झाडून हल्लेखोर फरार
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गोळीबारImage Credit source: Google
| Updated on: Aug 24, 2022 | 3:15 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीत हाय अलर्ट (High Alert) जारी केलेला असतानाच मंगळवारी दिवसाढवळ्या गोळीबारा (Firing)च्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यावसायिका (Businessman)वर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. यादरम्यान हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळावरून धूम ठोकली. राजधानीत ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात असताना दुपारच्या सुमारास नोकरदारांचे वर्दळ असतानाच ही घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. दिल्ली पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत असून घटनेमागील नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

हॉटेल व्यावसायिकाच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा

उत्तर दिल्लीतील बुरारी भागात मंगळवारी ही घटना घडली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीचे नाव अमित गुप्ता असे असून तो उत्तर दिल्लीच्या भागातील एक नामांकित व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक आहे. सध्या अमित गुप्ताला जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्याच्यावर अधिक उपचार करीत आहेत. गुप्ताच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली असून सध्या प्रकृती धोक्याबाहेर आहे. मंगळवारी दुपारी 12.55 वाजता ही घटना घडल्याचे दिल्ली पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले.

व्यावसायिकाच्या डाव्या पायाला आणि पोटात लागली गोळी

पोलीस उपायुक्त (उत्तर) सागर सिंग कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक गुप्तावर लेबर चौकात दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी गुप्ताला रुग्णालयात नेले. तेथे गुप्तावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अमितच्या डाव्या पायाला आणि पोटात गोळी लागल्याचे कलसी यांनी सांगितले. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 34 (सामान्य हेतू) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. व्यावसायिकाची त्याच्या क्षेत्रातील कोणाशी दुश्मनी आहे का, त्याचा तपास करून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तसेच कौटुंबिक पातळीवर काही वाद झाला होता का, याचाही विविध बाजूनी तपास केला जात असून फरार हल्लेखोरांना लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Firing on businessman in Delhi; accused escaped after incident)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...