AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे वय शाळेत जायचं होतं, त्या वयात त्यांच्या हातात पिस्तुलं, अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नाशिकमध्ये लूट करणारी टोळी ही परराज्यातील आहे. मुख्य आरोपी हा मध्यप्रदेश येथील आहे. तर दोघे अल्पवयीन आरोपी हे उत्तरप्रदेश येथील आहे.

जे वय शाळेत जायचं होतं, त्या वयात त्यांच्या हातात पिस्तुलं, अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटकImage Credit source: Google
| Updated on: Feb 24, 2023 | 9:24 AM
Share

नाशिक : नाशिकच्या तपोवन येथे एक जबरी चोरीची ( Robbery )  घटना घडल्याचे समोर आले आहे. काम आटोपून घराकडे निघालेल्या एकावर तीन जणांच्या टोळीने पिस्तूलचा धाक दाखवून लूट ( Crime News )  केली होती. त्यामध्ये पल्सरवर आलेल्या तिघांनी एकाच्या गाडीला गाडी आडवी लावली, एक जण खाली उतरला आणि बंदूक काढून डोक्याला लावली. पैसे दे अशी मागणी केली. त्यामध्ये पैसे नाहीत म्हणून लॅपटॉपची बॅग हिसकावून घेतली. आणि पोबारा केला. हा प्रसंग ऐन वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने लुटीची जोरदार चर्चा होत होती. मात्र, मंगळवारी घडलेल्या या घटनेची पोलीसांनी उकल केली असून त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहे.

नाशिकमध्ये लूट करणारी टोळी ही परराज्यातील आहे. मुख्य आरोपी हा मध्यप्रदेश येथील आहे. तर दोघे अल्पवयीन आरोपी हे उत्तरप्रदेश येथील आहे. या तिघांनाही नाशिक शहर पोलीसांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.

याशिवाय तपास करत असतांना त्यांनी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे नाशिक पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत केले जात असून शहरातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी सर्वोतपरी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

नाशिक शहरात चालता बोलता भररस्त्यात लुटीच्या घटना घडत असल्याने नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हसरूळ येथे राहणाऱ्या मुकेश चित्ते तपोवन येथे लूट झाली होती.

चित्ते यांच्यावर पिस्तूल रोखून चाळीस हजार रुपयांच्या लॅपटॉपची रक्कम साधारणपणे चाळीस हजार रुपये होती. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू करत मोठी कारवाई केलीय.

पंचवटी पोलीसांनी गुन्हा दाखल करताच गुन्हे शोध पथकाला याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार हिरवाडी येथील स्टेडियमजवळ तिघे पल्सर गाडीवर जात होते. गस्तीवर असलेल्या पोलीसांनी त्यांना हटकले तेव्हाच ते पळून जात होते.

मात्र, शहर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपास करत त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, चोरीचा लॅपटॉप, चाकू आणि चार मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी असा जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईत उत्तरप्रदेश येथील दोन अल्पवयीन मुलांसह मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या अवणेश उर्फ आयुष मथुरा केवट या तिघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहे.

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यासह मुंबईतील तळोदा येथील चोरीची कबुली दिली आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलीसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले जात आहे. तपोवन येथील लुटीची घटना समोर आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.