Maval – हप्ता न दिल्याने चौघांकडून दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटिव्हीत कैद

जय भालेराव, कुमार मोहिते, हर्ष साठे आणि अनिल मोहिते या तरुणांना ताब्यात घेतल्यापासून त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. त्यांना ताब्यात घेतल्यापासून परिसरात खळबळ माजली आहे.

Maval - हप्ता न दिल्याने चौघांकडून दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटिव्हीत कैद
मावळ पोलिस स्टेशन
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 31, 2022 | 10:28 AM

मावळ – तळेगाव (Talegaon) दाभाडे येथे खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करत जबरदस्तीने खिशातील पाच हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली आहे. या प्रकरणी जय भालेराव, कुमार मोहिते, हर्ष साठे आणि अनिल मोहिते यांना पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे. चोघेजण हप्ता मागण्यासाठी दुकानात गेले होते अशी तक्रार यांच्याविरोधात दाखल झाली आहे. त्याचबरोबर मारहाण आणि पैसे घेतल्याचा व्हिडीओ सीसीटिव्हीत (cctv) कैद झाला आहे. त्यामुळे चौकशीत अजून बरंच काही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

आईस्क्रीमच्या दुकानात या चौघांनी हप्त्याची मागणी केली होती. हप्ता न दिल्याने आरोपींनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून कामगारांना मारहाण केली आहे. तसेच फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यानुसार तळेगांव पोलिसांनी या चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता चार जणांची कसून चौकशी सुरु असून सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर हे कधीपासून हप्ता गोळा करीत होते. त्याच्या टोळीत किती सक्रीय आहेत या सगळ्या गोष्टीची चौकशी पोलिस करणाार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस चौकशीत अजून काही गोष्टी उघड होण्याची शक्यता

जय भालेराव, कुमार मोहिते, हर्ष साठे आणि अनिल मोहिते या तरुणांना ताब्यात घेतल्यापासून त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. त्यांना ताब्यात घेतल्यापासून परिसरात खळबळ माजली आहे. तसेच तिथल्या अन्य दुकानदारांची देखील चौकशी होणार आहे. कारण हे प्रकरण फक्त एका दुकानदाराशी निगडीत आहे की, अन्य दुकानदार देखील याला बळी पडले आहेत हा सुद्धा चौकशीचा भाग आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें