एटीएममध्ये फेविक्विक, बोगस हेल्पलाइन; ‘अशी’ फसवणूक करायची टोळी

सायबर सेलने आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. युपीतील मैनपुरी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

एटीएममध्ये फेविक्विक, बोगस हेल्पलाइन; 'अशी' फसवणूक करायची टोळी
एटीएम मशिनद्वारे फसवणूक करणारी टोळी अटकImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 3:52 PM

मैनपुरी : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सिम कार्ड्स, एटीएम कार्ड्स आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. सायबर सेलने आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. युपीतील मैनपुरी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

काय आहे मोडस ऑपरेंडी?

आरोपी एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकावे यासाठी आधी एटीएममध्ये गम लावायचे. मग दुसरा आरोपी पीडित व्यक्तीला बोगस हेल्पलाईनवर कॉल करायचा सल्ला द्यायचा.

त्या नंबरवर कॉल केल्यानंतर कार्डशी संबंधित गोपनीय माहिती विचारायचा. त्यानंतर ग्राहकाला मूर्ख बनवून तांत्रिक पथक येईल असे सांगून तेथून पाठवून सर्जिकल ब्लेडच्या सहाय्याने कार्ड काढून इतर एटीएममधून खात्यातून पैसे काढायचे.

हे सुद्धा वाचा

आरोपींनी अनेक राज्यात केली फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आतापर्यंत आरोपींनी अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारे फसवणूक केली आहे. आरोपींकडून 75 हजार रुपये रोकड, 48 एटीएम कार्ड, 65 सिम कार्ड आणि 2 बेकायदेशीर पिस्तूल, 6 मोबाईल फोन आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

एटीएममध्ये कार्ड अडकल्याच्या आणि ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. यानंतर सायबर सेलचे प्रभारी राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करत तपास करण्यात आला. तपासानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.