AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीम खोलून देतो, उद्योगपती असल्याचं सांगितलं, जीम ट्रेनर प्रेमात पडली, नंतर प्रियकर निघाला चक्क कुख्यात गुंड

प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. पण बऱ्याचदा या आंधळेपणामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं. कोल्हापुरच्या जीम ट्रेनर तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे.

जीम खोलून देतो, उद्योगपती असल्याचं सांगितलं, जीम ट्रेनर प्रेमात पडली, नंतर प्रियकर निघाला चक्क कुख्यात गुंड
कोल्हापूरच्या जीम ट्रेनरचा चक्क कुख्यात गुंडावर जीव जडला, भोगावी लागली प्रेमाची शिक्षा
| Edited By: | Updated on: Apr 08, 2021 | 10:17 PM
Share

कोल्हापूर : हरियाणा आणि राजस्थान राज्यांमध्ये थैमान घालणारा गुंड महाराष्ट्रात पळून आला. तो कोल्हापुरात लपून बसला. पुढे त्याची ओळखी एका मुलीसोबत झाली. ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली. तो तिच्यासोबत राहू लागला. मात्र, अचानक पोलिसांना तो कोल्हापुरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुंडासोबत त्याच्या प्रेयसीला देखील अटक केली. गुंडाच्या प्रेयसीला त्याच्या गुन्हेगारी विश्वासंबंधित काहीच माहिती नव्हती. तो एक उद्योगपती आहे, असं तिला वाटत होतं. मात्र, जेव्हा खरं समोर आलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन घसरली. पण तोपर्यंत बराच उशिर झाला होता. पोलिसांनी गुंडासोबत तिलाही बेड्या ठोकल्या (Gangster Papla Gujjar girl friend granted bail from Rajasthan High Court).

नेमकं प्रकरण काय?

प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. पण बऱ्याचदा या आंधळेपणामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं. कोल्हापुरच्या जीम ट्रेनर तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. या तरुणीचं एका कुख्यात गँगस्टर पपला गुर्जर याच्यावर जीव जडला होता. तिचा प्रियकर हा गुंड आहे, याबाबत तिला माहित नव्हतं. पण पोलिसांनी जेव्हा गँगस्टरला कोल्हापूर येथून अटक केली तेव्हा त्यांनी तरुणीलाही अटक केली. गँगस्टरवरील प्रेमापायी तिलादेखील जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ जेलची हवा खावी लागली. अखेर वकिलांच्या प्रयत्नांमुळे तिला जेलमधून बाहेर पडता आलं.

तरुणीचे वडील पेशाने डॉक्टर

संबंधित तरुणीचे वडील हे पेशाने डॉक्टर आहेत. तर आई गृहिणी आहे. तिला दोन बहिणी आहेत. तिचं 2014 साली भोपाळच्या एका नवाब कुटुंबातील व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. मात्र, तिच्या नवऱ्याचं दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने पतीला घटस्फोट दिला होता (Gangster Papla Gujjar girl friend granted bail from Rajasthan High Court).

तरुणी पपला याला जीममध्ये पहिल्यांदा भेटली

राजस्थान आणि हरियाणा राज्यात थैमान घालणारा कुख्यात गुंड पपला गुर्जर हा फरार होता. तो महाराष्ट्रात कोल्हापूर येथे पळून आला होता. तिथेच त्याची या तरुणीसोबत एका जीममध्ये भेट झाली. त्याने तिला तेव्हा स्वत:चं नाव मानसिंह पुत्र हरिशचंद्र यादव असं सांगितलं होतं. याशिवाय दिल्लीच्या छतपुरा येथे आपण राहत असून लॉकडाऊन काळात इथे फसल्याचं त्याने तिला सांगितलं होतं. महाराष्ट्रात आपण व्यवसायाच्या निमित्ताने आल्याचंही त्याने सांगितलं होतं. तरुणी भोळेपणात त्याच्या खोट्या गोष्टींमध्ये भरकटत गेली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. कोल्हापुरात ते दोघं एकत्र राहू लागले.

पपला प्रेयसीसाठी जीम खोलणार होता

पीडित तरुणी ही कोल्हापुरात एका जिममध्ये जीम ट्रेनरची नोकरी करायची. तिला महिन्याला 35 हजार पगार होता. तिची पपला गुर्जरसोबत 13 डिसेंबर रोजी भेट झाली होती. पपलाने तिला तिच्यासाठी नवी जीम उघडण्याचं आश्वासन दिलं होतं. याशिवाय तो त्यासाठी पैशांचा बंदोबस्त करणार, असंही त्याने तिला सांगितलं होतं. त्यानंतर तरुणी आणि पपला यांच्यातील संबंध वाढत गेले. दोघांची रोज भेट व्हायला लागली. त्यानंतर तरुणी पपलाच्या प्रेमात पडली.

त्यानंतर तरुणी आणि पपला दोघंही एकाच रुममध्ये राहू लागले. पपलाने खोटं आधारकार्ड बनवलं होतं. तेच आधारकार्ड त्याने रुम मालकाला दिलं होतं. पपला हा शाकाहारी होता. तो हनुमान आणि कालिका देवीची दिवसरात्र पुजा करायचा, असंही तरुणीने जेलमधून बाहेर पडल्यानंतर सांगितलं.

हेही वाचा : मोठी बातमी: अनिल देशमुखांना दणका; सीबीआय चौकशी योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.