धक्कादायक, लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच नवऱ्याने हुंड्यासाठी केले अपहरणाचे नाटक, तपासानंतर समजले खरे कारण

गाजियाबादमधील 24 वर्षाच्या रिया जैन हिचा विवाह दहा महिन्यापूर्वी अभियंता असलेल्या आकाश त्यागी बरोबर झाला होता. विवाह होण्यापूर्वी त्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा विवाह करून दिला होता. लग्नानंतर काही दिवसातच आकाश यांच्या घरातील सदस्यांनी रियाला हुंड्यावरून त्रास देण्यास सुरुवात केली. आणि काही दिवसातच तिची हत्या करण्यात आली.

धक्कादायक, लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच नवऱ्याने हुंड्यासाठी केले अपहरणाचे नाटक, तपासानंतर समजले खरे कारण
Gaziyabad Murder
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:45 PM

दिल्लीः जग कितीही पुढे गेले तरी समाजातील काही रितीरिवाज आणि परंपरा जैसे थेच असतात. त्यामुळे आजही हुंडाबळीचा आकडा कमी न होता तो वाढतच जाताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यासाठी एका नवविवाहितेची हत्या करण्यात आली आहे. तिच्या हत्येनंतर (Murder) तिच्या अपहरणाचा बनावही करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र पोलिसांनी (Police)कसून चौकशी केल्यानंतर नवऱ्यासर सासू सासऱ्यालाही अटक झाली आहे. उत्तर प्रदेशमधील गाजियाबादच्या विजयनगर परिसरात समाजाला काळीमा फासण्यासारखीच घटना घडली आहे. नवविवाहित पत्नीची नवऱ्याने हत्या केली. आणि त्यानंतर आपल्या आई वडिलांसमोर पत्नीच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे जंगलात आणि नदीत फेकून दिले. त्यानंतर नवरा आणि सासू सासरे यांनी मुलाच्या पत्नीचे अपहरण झाल्याचे नाटक रचले.

गाजियाबादमधील 24 वर्षाच्या रिया जैन हिचा विवाह दहा महिन्यापूर्वी अभियंता असलेल्या आकाश त्यागी बरोबर झाला होता. विवाह होण्यापूर्वी त्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा विवाह करून दिला होता. लग्नानंतर काही दिवसातच आकाश यांच्या घरातील सदस्यांनी रियाला हुंड्यावरून त्रास देण्यास सुरुवात केली.

गळा चिरून हत्या

रियाला हुंडा घेऊन येण्यासाठी त्रास देण्यास सुरूवात झाल्यानंतर लग्नानंतर अवघ्या दहाव्या महिन्यातच रियाचा हुंड्यासाठी गळा चिरून हत्या करण्यात आली. रियाच्या शरीराचे तुकडे करुन नहर आणि मुरादनगरच्या जंगलात फेकून दिले. रियाच्या हत्या केल्यानंतर आकाश आणि त्याच्या घराच्यांनी पोलीस आणि नातेवाईकांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.

नवऱ्याचा कट, पोलीसही चक्रमले

रियाच्या नवऱ्याने कट करून पोलिसांना फोन करून सांगितले की, माझ्या पत्नीचे अपहरण झाले आहे. फोनवरून माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलिसांनी तपास सुरू केला. रियाच्या शोधासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली. तर दुसऱ्या टीमने कुटुंबियांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तपासात माहित उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

मानवतेला काळीमा

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांना धक्कादायक माहिती समोर आली.रियाच्या नवऱ्याने व सासू सासऱ्याने रियाचा तिचा गळा चिरून धडापासून वेगळा केला होता, व तो नहरच्या डोंगरात फेकून देण्यात आला होता. त्याआधी रियाच्या नवऱ्याने सांगितल रियाच्या भावाने कुणाकडे कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून आमच्या घरात काही माणसे आली आणि रियाला घेऊन गेली असे पोलिसांना सांगण्यात आले.

पोलिसांनी सांगितले या घटनेसाठी त्यांनी एक नाटक रचले होते. त्यातून त्यांना वाटले की, पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळणार नाही आणि तिचा मृतदेहही मिळणार नाही.

सविस्तर बातमी

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.