घरात फक्त महिलाच राहत होत्या… पोलिसांनी दरवाजा ठोठावला, त्यानंतर…

गाझियाबादच्या वैशाली सेक्टर-4 मध्ये एका घरात चालणारा वेश्या व्यवसाय पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांना खबऱ्याने टिप दिल्यानंतर छापा मारून तीन महिलांची सुटका करण्यात आली आणि एक महिलेला अटक करण्यात आली. अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे.

घरात फक्त महिलाच राहत होत्या... पोलिसांनी दरवाजा ठोठावला, त्यानंतर...
क्राईम न्यूज
| Updated on: Mar 07, 2025 | 7:49 AM

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गाजियाबादच्या वैशाली सेक्टर-4 मधील एका घरात केवळ महिला राहत होत्या. तिथे नेहमी पुरुषांचं येणं जाणं सुरू होतं. पण संध्याकाळ होताच या घरात हालचाली वाढायच्या. पोलिसांना जेव्हा या घराच्याबाबत माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी या घरावर वॉच ठेवणं सुरू ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी एक दिवस अचानक या घरात छापा मारला आणि समोर जे काही दिसलं त्याने पोलीस हैराण झाले.

वैशाली सेक्टर – 4मधील या घरात वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. घरात फक्त महिलाच का? असा संशय आल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा ठोठावला आणि पोलीस हैराण झाले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची पोलिसांनी या घरातून सुटका केली. तसेच धंदा चालवणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. इंदिरापूरम आणि कौशाम्बी पोलिस ठाण्याने ही धाड मारली. पोलिसांनी धाड मारून घरातून अनेक आपत्तीजनक गोष्टी जप्त केल्या आहेत.

खबऱ्याने टिप दिली अन्…

पोलिसांना खबऱ्यांनी टिप दिली. त्यामुळे पोलिसांनी वैशाली सेक्टर-4मध्ये या घरात छापा मारला. या घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं पोलिसांना कळलं होतं. त्यामुळे पोलिसांनी या घरावर वॉच ठेवायला सुरुवात केली होती. गरीब आणि गरजू महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायात ढकललं जात होतं. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त, इंदिरापूरम आणि कौशाम्बी पोलिसांनी अॅक्शन घेत घरावर छापा मारला. यावेळी तीन महिलांची देह व्यापारातून सुटका करण्यात आली.

लालच दाखवून…

पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेलाही अटक केली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता अधिक माहिती मिळाली. अनैतिक कमाईची लालच दाखवून महिलांना काम देण्याच्या आणि त्या बदल्यात पैसे देण्याचे प्रलोभन दिलं जात होतं. त्यामुळे या महिला पैशाच्या गरजेपोटी या जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करत होत्या. वेश्या व्यवसाय चालवणारी महिला ग्राहकांकडून मोठी रक्कम घ्यायची आणि त्यातील काही भाग या महिलांना खर्चासाठी द्यायची.

बऱ्याच दिवसापासून वेश्या व्यवसाय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने बाकीच्या महिलांना बऱ्याच दिवसापासून वेश्या व्यवसायात ढकललं होतं. ती स्वत: ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करायची. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची टोळी उद्ध्वस्त करून महिलांना संरक्षण देण्याचं काम पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांविरोधात अनैतिक व्यापार (निवारण) अधिनियमाच्या कलम 3, 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.