एकाच गावातील तरुण-तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

कोल्हापुरात एकाच गावातील दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकाच गावातील तरुण-तरुणीने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली.

एकाच गावातील तरुण-तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या
तरुण-तरुणीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 9:29 AM

कोल्हापूर : कोल्हापुरात एकाच गावातील दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे (Girl And Boy Died By Suicide). कोल्हापुराजवळील चुये गावातील तरुण-तरुणीने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. तरुणाने राहत्या घरी तर तरुणीने पाचगाव येथे नातेवाईकाच्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे (Girl And Boy Died By Suicide).

तरुणाने आपल्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी, तर तरुणीने पाचगाव येथे नातेवाईकाच्या घरी केले विष प्राशन करत आत्महत्या केली. अनिकेत पाटील असं तरुणाचं, तर सानिका व्हनाळकर असं तरुणीच नावं आहे. दोघानाही उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यानं गावात चर्चेला उधाण आलं आहे.

प्रेमाला विरोध झाल्यानं या दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावात आहे. मात्र, तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत लग्नासाठी कर्ज व्हायला नको,. यासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.

सानिकाच्या सुसाईड नोटमध्ये काय?

“मामी, मामा, आई, मम्मी मी हे पाऊल उचलत आहे कारण माझ्यामुळे मम्मीला त्रास नको. माझ्या लग्नाचं कर्ज व्हायला नको तिच्या डोक्यावर. पप्पा असे वागतात. मला आता सहन होईना झालंय. सोन्याचं आणि नयनचं आयुष्य व्यवस्थित करा. यात मामींना दोष देऊ नका, त्यांना यातलं काहीही माहित आणि जमलं तर माफ करा मला… तुमची सानिका” (Girl And Boy Died By Suicide).

तरुण-तरुणीची आत्महत्या

तरुण-तरुणीची आत्महत्या

दोघांचीही विष प्राशन करत आत्महत्या

मृत अनिकेत पाटील हा बीएससीचं शिक्षण घेत होता. काल दुपारी तो महाविद्यालयातून घरी आला, त्यानंतर अभ्यासाच्या खोलीत जाऊन त्याने विषारी औषध प्राशन केले. तर सानिकाचा विवाह ठरला होता. त्यामुळे ते पाचगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती. इथेच तिनेही विषारी औषध प्राशन केले. गावातील तरुण तरुणीचा एकाच वेळी असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेची नोंद ईस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Girl And Boy Died By Suicide

संबंधित बातम्या :

‘न्याय मिळाला नाही तर 5 दिवसाच्या आत आत्महत्या करणार’, पीडितेचा इशारा, मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार?

सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.