दारुच्या नशेत नातवाची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल

| Updated on: Mar 02, 2022 | 11:29 PM

ज्या वयात नातवंडांनी आजी-आजोबांची काळजी घेतली पाहिजे. त्याच वयात या निष्ठूर नातून आजीला मारहाण (Grandson Beating Grandmother) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खलबळ माजली आहे.

दारुच्या नशेत नातवाची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

सांगलीआजी-आजोबा (Grandmother) आपल्या नातवावर जीवापाड प्रेम करतात. नातवांना (grandson) खेळवण्याची, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात आजी-आजोबांना मोठा आनंद मिळतो. नातवांनाही लहानपणी आजी-आजोबांचा चांगलाच लळा लगालेला असतो. मात्र याच नात्याला काळीमा फासण्याचे काम सांगलीतल्या एका नातूने केले आहे. या नातूने जो प्रकार केलाय ते पाहून तुमचाही संताप होईल. या प्रकारनंतर एक नातू एवढा निष्ठूर कसा असू शकतो, असा सवाल तुमच्या आमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वयात नातवंडांनी आजी-आजोबांची काळजी घेतली पाहिजे. त्याच वयात या निष्ठूर नातून आजीला मारहाण (Grandson Beating Grandmother) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खलबळ माजली आहे. या प्रकरणाने परिसर हादरून गेलाय. या घटनेने या नात्याला या नातून काळीमा फासल्याच्या भावना परिसरातील लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

महिलांनी शिकवला धडा

हा प्रकार सांगतीत घडल्याचे समोर आल्यानंतर याची दखल शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर या नातूला हे प्रकरण चांगलेच महागात पडलंय. हा नातू आज्जीला दारूच्या नशेत रोज मारहाण करत होता. त्याचा मारहाण करताना व्हिडीओ शेजाऱ्यांनी शिवसेनेकडे पाठवला. तात्काळ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अधेक्षा सुजाता इंगळे यानी पदाधिकारी याना घेऊन घटनास्थळी धाव घेत शिवसेना स्टाईलने शिवसेनेच्या महिलांनी नातवाला चोप देत त्या नराधामास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे त्याला या मारहणीची आता चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे. हे स्पष्ट झाले आहे.

पोलीस मस्ती जिरवणार?

सांगलीच्या माधवनगर कर्नाळ रोडवर हा नाराधम भाड्याच्या घरात राहतो. त्याची आई वडील आज्जी आणि तो घरात राहतात. आज्जीला चालता येत नसल्याने घराबाहेर तिला ठेवण्यात आले आहे. आणि हा दारू पिऊन तिला मारहाण करत असतो. शेजारी सोडवण्यासाठी गेले तर त्यांना शिवीगाळ करत होता. मात्र शिवसेनेने या नातुला इंगा दाखवत चांगलेच थंड केले आहे. आता कुणावर हात उचलताना तो दहा वेळा विचार करेल. शेजाऱ्यांनी हा व्हिडिओ बनवून शिवसेनेकडे पाठवल्याने या आजीची या अमानुष जाचातून सुटका होण्यास मदत झाली आहे.

Sachin Vaze : न्यायालयाच्या दणक्यानंतर सचिन वाझेची याचिका मागे, नेमकं प्रकरण काय?

Murder | बापलेकाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाचा मृतदेह पुरला, तर दुसऱ्या मृतदेहासोबत…

अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ! रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश