AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वधू माझी आहे, नवऱ्याला आला व्हॉट्सॲपवर मेसेज.. आणि मंडपातूनच परतली वरात !

होणाऱ्या नवऱ्याला व्हॉट्सॲपवर आलेल्या एका मेसेजमुळे भर मंडपातच लग्न मोडले आणि वधूला न घेताच वरात परत गेली.

वधू माझी आहे, नवऱ्याला आला व्हॉट्सॲपवर मेसेज.. आणि मंडपातूनच परतली वरात !
| Updated on: Jun 01, 2023 | 9:48 AM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील एका गावात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र शहनाईचे सूर गुंजत असताना सर्वांनाच मोठा धक्का बसला. लग्न लागल्यावर वर-वधू स्टेजवरील सोफ्यावर विराजमान झाले होते. मात्र त्याचवेळी वराच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि त्याला व्हॉट्सॲप मेसेज (whatsapp message) चेक करायला सांगितले. मात्र ते फोटो पाहून त्याला एवढा मोठा धक्का बसला की त्याने ते लग्न (broken marriage) तिथेच मोडले आणि वधूला न घेताच त्यांची वरात परत गेली. हसतंखेळतं लग्नघर क्षणार्धात दु:खात बुडालं.

नवऱ्याच्या त्याच्या व्हॉट्सॲपवर त्याच्या भावी पत्नीचे काही अंतरंगी आणि आक्षेपार्ह स्थितीतील फोटो होते. यानंतर, नवरा मुलगा आणि फोनवर पलीकडे असलेल्या व्यक्तीमध्ये फोनवर जोरदार वादावादी सुरू झाली. शेवटी, वर स्टेजवरून खाली उतरला आणि हे लग्न होऊ शकत नसल्याची घोषणा त्याने केली. हे प्रकरण शोहर्ताड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकडी या गावाशी संबंधित आहे जिथे सोमवारी रात्री लग्नाची वरात आली होती. नातेवाईकांसह संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नाच्या आनंदात व्यग्र होते, मात्र वराचा (लग्न मोडल्याचा) निरोप आल्यानंतरच संपूर्ण वातावरण बदलून गेले.

या घटनेनंतर पोलीस व ग्रामस्थांसह ग्रामस्थ, प्रज्ञावंत, नातेवाईक यांनी वराची समजूत घालण्यास सुरुवात केली. तसेच व्हिडिओ व फोटो पाठवणाऱ्या तरुणाला पकडण्यात आले. लोकांनी त्याला समजावूनही सांगितले, पण तो तरुण त्याच्या वागण्या-बोलण्यापासून परावृत्त होऊ शकला नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर वऱ्हाड्यांनी लग्नास नकार दिला आणि लग्न न करताच वरात परत घेऊन निघाले. पोलिसांनी लग्नात अडथळा आणणाऱ्या तरुणाला पकडून शोहरातगड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. याबाबत न्यायाधिकारी गरवित सिंह यांनी सांगितले की, वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरून विवाहात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...