AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीवर बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध, नराधमाला आजीवन कारावास

एका सात मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. आरोपीचा शोध लागत नव्हता, अखेर बकऱ्यांमुळे आरोपी सापडला.

बकऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीवर बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध, नराधमाला आजीवन कारावास
अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 18, 2023 | 2:53 PM
Share

हरियाणा | 18 ऑगस्ट 2023 : हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील एका गावात एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीवरील गुन्हा सिद्ध होण्यात बकऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. या प्रकरणातील आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. चार वर्षे जुन्या प्रकरणात आरोपीवर नूंह कोर्टाने वेगवेगळ्या कलमांखाली आरोपपत्र दाखल करीत 75 हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे.

हरियानाच्या नूंह जिल्ह्यात 26 डिसेंबर 2019 रोजी एका व्यक्तीने सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करीत तिची हत्या केली होती. या अल्पवयीन बालिकेच्या पित्याने 27 डिसेंबर रोजी फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला.

झुडुपात मृतदेह सापडला

या प्रकरणातील सरकारी वकील आकाश तंवर यांनी सांगितले की मुलीच्या पित्याने तक्रारीत म्हटले होते की त्यांची सात वर्षीय मुलगी रोजच्या सारखी 26 डिसेंबर 2019 रोजी गावानजिकच्या डोंगरात बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. ती घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी गावातील अन्य रहीवाशांच्या मदतीने शोधाशोध केली तर झुडपांमध्ये तिचा मृतदेह आढळला.

अखेर आरोपीची ओळख पटली

घटनेचा तपास करताना पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातीस सर्व सीसीटीव्ही तपासले. ज्यात एक युवक बकऱ्यांना घेऊन जाताना दिसत आहे. पीडीताच्या वडीलांना हे सीसीटीव्ही फुटेज दाखविले तेव्हा त्यांनी त्यांच्या बकऱ्यांना ओळखले. त्यानंतरच आरोपीची ओळख पटली. या प्रकरणी मुकीम उर्फ मुक्की याला अटक करण्यात येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान
मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान.
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत.
जलील यांच्या MIM पक्षाच्या रॅलीत कार्यकर्त्यांनाच मारहाण, घडलं काय?
जलील यांच्या MIM पक्षाच्या रॅलीत कार्यकर्त्यांनाच मारहाण, घडलं काय?.
जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, थेट 50 जणांवर...
जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, थेट 50 जणांवर....
कुठं-कुठं दोन्ही NCP एकत्र अन् कुठं स्वबळाचा नारा?
कुठं-कुठं दोन्ही NCP एकत्र अन् कुठं स्वबळाचा नारा?.
भ्रष्टाचाराचे आका नेमका कोण? अजित पवार यांचं मोठं विधान अन्...
भ्रष्टाचाराचे आका नेमका कोण? अजित पवार यांचं मोठं विधान अन्....
26 जुलैच्या पुरात हे दोघं भाऊ कुठं होते? शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका
26 जुलैच्या पुरात हे दोघं भाऊ कुठं होते? शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका.
बाळासाहेब एकच ब्रँड, ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू...फडणवीसांचा निशाणा
बाळासाहेब एकच ब्रँड, ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू...फडणवीसांचा निशाणा.
अभी नही तो कभी नहीं... ठाकरे बंधूंच्या गर्जनेला शेलारांनी फटकारलं
अभी नही तो कभी नहीं... ठाकरे बंधूंच्या गर्जनेला शेलारांनी फटकारलं.
मुंबईचं डेथ वॉरंट ते एकत्र यायला 20 वर्ष का लागली? ठाकरेंच्या डरकाळ्या
मुंबईचं डेथ वॉरंट ते एकत्र यायला 20 वर्ष का लागली? ठाकरेंच्या डरकाळ्या.