AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवैध पर्ससीन मासेमारी प्रकरण, उच्च न्यायालयाने मत्स विभागाला दिले ‘हे’ आदेश

वर्ष 2021 मध्ये सागरी मासेमारी कायद्यात सुधारणा करून लाखो रुपये रकमेची दंडाची नौका जप्तीची तरतूद केलेली असताना खुलेआम होणारी अवैध विनाशकारी मासेमारी आजही सुरूच आहे.

अवैध पर्ससीन मासेमारी प्रकरण, उच्च न्यायालयाने मत्स विभागाला दिले 'हे' आदेश
नामांतर अधिसूचनेला नव्याने आव्हान देण्याची मुभा
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 20, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध पर्ससीन मासेमारीबाबत 24 फेब्रुवारीपर्यंत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 9 मार्च 2023 रोजी होणार आहे. अवैध मासेमारी विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरात गेली अनेक वर्षे कायद्याचे उल्लंघन करून खुलेआम विनाशकारी अवैध पर्ससीन आणि एलईडी पर्ससीन मासेमारी सुरू आहे. त्याविरुद्ध तक्रारी आंदोलने करूनही त्यांना रोखले जात नसल्याने 2021 मध्ये ॲड. मोहित दळवी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती.

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

वर्ष 2021 मध्ये सागरी मासेमारी कायद्यात सुधारणा करून लाखो रुपये रकमेची दंडाची नौका जप्तीची तरतूद केलेली असताना खुलेआम होणारी अवैध विनाशकारी मासेमारी आजही सुरूच आहे. लोकसेवक म्हणून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या मत्स्य अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आदेश व्हावेत, अशा स्वरूपाची मागणी याचिकाकर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.

अवैध मासेमारीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करत खुलासा करण्याचे आदेश

या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी अवैध मासेमारीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यालयाने मत्स विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारवाईची जबाबदारी मत्स्य व्यवसाय प्रधान सचिव, आयुक्त, रत्नागिरी व सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर प्राधिकरण, रत्नागिरीचे मत्स्य विकास अधिकारी, सिंधुदुर्ग आमि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व परवाना अधिकारी यांची आहे.

पर्ससीन मासेमारीसाठी नियमन

विनाशकारी अवैध पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी 5 फेब्रुवारी 2016 रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 कायद्यान्वये पर्ससीन मासेमारीचे नियमन केले आहे. त्यानुसार पर्ससीन मासेमारीसाठी नवीन परवाने देण्याचे बंद केले आहे. पर्ससीन मासेमारीचे परवाने प्राप्त नौकांनी पारंपरिक मच्छीमारांच्या राखीव क्षेत्राबाहेर राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करायची आहे.

500 मीटर लांबी 40 मीटर उंची आणि 25 मिलिमीटर पेक्षा कमी नसलेल्या आसाचे जाळे वापरावे. बूम प्रतिबंधित एलईडी लाइट आणि रसायनाचा वापर न करता 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पर्ससीन मासेमारीला परवानगी आहे.

Follow Us
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द