घाटात पिकअपचा भीषण अपघात, नागमोडी वळणावर गाडी पलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू
पिकअप वाहनात असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Pickup Accident) जिल्ह्यातील धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदशैली घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाटात रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा असलेल्या, पिकअप गाडीत प्रवासी करणाऱ्या तीन प्रवाशांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती मिळाली आहे. हा चांदसैली घाट (Chandsaili Ghat) असून नागमोडी वळणावरून तीन पलटी खाल्ल्याने गाडी दरीत कोसळली आहे. पोलिसांनी (Nandurbar police) दिलेल्या माहितीनुसार, एकाची प्रकृती नाजूक आहे. ज्यावेळी हा अपघात झाला. त्यावेळी, मोठा आवाज झाल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या कारणामुळे अपघात झाला
पिकअप वाहनात असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत. धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता हा खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचं म्हटलं जात आहेत. खचलेल्या रस्त्यांमुळे अजून किती प्रवाशांचा जीव प्रशासन घेणार आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात
महाराष्ट्रात अपघाताच्या रोज नव्या गोष्टी घडत असतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील होत असतो. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागात अरुंद रस्ते, त्याचबरोबर खचलेले रस्ते यामुळे अपघात होतात. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहीजणांचा जीव गेला आहे.
