‘तुझा कोंबडा माझ्या घरात कसा आला’…, नवरा बायकोला काठीने बेदम मारहाण
घरात कोंबडा का शिरला गोष्टीवरुन दोन कुटुंबात तुफान राडा झाल्याचं तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. नवरा बायकोला काठीने मारहाण करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : घरात कोंबडा (the rooster) शिरला म्हणून नवरा आणि बायकोला काठीने मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (police station) दाखल झाली आहे. दोन्हीकडून तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिस या प्रकरणाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. हे प्रकरण मध्यप्रदेश (MP) राज्यातील इंदोर येथील असल्याची एका वेबसाईटने म्हटलं आहे. चंदन नगर पोलिस स्टेशनला दोन्ही कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. मुळात हे प्रकरण अनेकांसाठी हास्यास्पद आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर ही गोष्ट चांगलीचं व्हायरल झाली आहे.
नवरा बायकोला काठीने बेदम मारहाण
अतिरिक्त डीसीपी इंदोर पोलिस प्रवक्ता राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, हे प्रकरण चंदननगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतं, हा प्रकार खिजरा पार्क कॉलनीत घडला आहे. या प्रकरणात एका बाजूच्या लोकांनी त्यांनी दुसऱ्या घरातील लोकांनी काठीने मारहाण केल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्या लोकांसोबत भांडण झाले आहे, त्यांनी सुध्दा तक्रार दाखल केली आहे.
आमचा कोंबडा त्यांच्या घरात घुसला
तक्रारदार अनवर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आमचा कोंबडा त्यांच्या घरात घुसला होता. या गोष्टीमुळे जावेद हा आम्हाला शिव्या देत होता. ज्यावेळी अनवर यांनी शिव्या देण्यापासून त्याला रोखलं, त्यावेळी त्याने दांडक्याने आम्हाला मारहाण केली. जावेदला त्याच्या पत्नीने अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अनवरच्या बायकोला सुध्दा जावेदने मारहाण केली.
कुत्रा घरात शिरला म्हणून एका व्यक्तीने गोळीबार केला
हा प्रकार ज्यावेळी शेजारच्या लोकांनी पाहिला त्यावेळी त्यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर दोघांची चौकशी सुरु केली आहे. पोलिस म्हणत आहेत की, अशा पद्धतीची अनेक प्रकरण आतापर्यंत बऱ्याचदा आमच्याकडे आली आहेत. काही दिवसांपुर्वी कुत्रा घरात शिरला म्हणून एका व्यक्तीने गोळीबार केला होता. त्यामध्ये सुध्दा एकाचा मृत्यू झाला होता.
