Jharkhand Double Murder : आधी चार महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडले, मग पत्नीची गळा आवळून हत्या

गढवा जिल्ह्यातील धुरकी पोलीस स्टेशन हद्दीतील तातीदिरी गावात 30 मे रोजी ही घटना घडली होती. विनिताने अरविंदला त्याच्या रहायला जायचे असे सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता.

Jharkhand Double Murder : आधी चार महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडले, मग पत्नीची गळा आवळून हत्या
बंगुळुरुमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 08, 2022 | 2:45 AM

गढवा : झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी एका पतीने आधी आपल्या चार महिन्यांच्या चिमुरडीला पायाखाली चिरडून ठार केले. मुलीला ठार मारल्याचे पाहताच पत्नी (Wife)ने आरडाओरडा सुरु केल्याने पती (Husband)ने साडीने गळा आवळून तिचीही हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह झुडुपात आणि पत्नीचा मृतदेह विहिरीत टाकून दिला. ही धक्कादायक घटना 30 मे रोजी घडली होती. दोन महिने प्रकरणाचा तपास करत अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक प्रकरण उजेडात आले. आरोपीची रवानगी गढवा कारागृहात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी अरविंद साव आणि पीडिता विनिता कुमारी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र समाजाच्या भीतीने तो पत्नीसह दुसऱ्या गावी राहत होता. या जोडप्याला एक मुलगीही झाली. दरम्यान, अरविंदच्या आई-वडिलांनी त्याचे दुसरीकडे लग्न समजवले. यामुळे अरविंद विनिता आणि मुलीपासून दूर राहू लागला होता. गढवा जिल्ह्यातील धुरकी पोलीस स्टेशन हद्दीतील तातीदिरी गावात 30 मे रोजी ही घटना घडली होती. विनिताने अरविंदला त्याच्या रहायला जायचे असे सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून अरविंदने चार महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडून ठार केले. मुलगी मेल्याचे पाहून विनिताने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे अरविंदने तिचा साडीने गळा आवळला. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. तर मुलीचा मृतदेह झुडुपात टाकला.

प्रदीर्घ तपासानंतर आरोपीला अटक

स्थानिक रहिवाशांनी विहिरीत महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिक पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. आसपासच्या परिसरात मृत महिलेविषयी चौकशी केली. मात्र कुणीही महिलेला ओळखत नव्हते. खूप प्रयत्न करुनही मृतदेहाची ओळख न पटल्याने अखेर 72 तासांनी पोलिसांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना मयत महिलेचे नाव विनिता कुमारी असून ती रांका पोलीस स्टेशन हद्दीतील पाल्हे गावातील रहिवासी असल्याचे पोलिसांना कळाले. त्याआधारे पोलिसांनी विनीताच्या आई-वडिलांशी संपर्क साधला असता दुहेरी हत्याकांडाचे धक्कादायक वास्तव समोर आले. अखेर प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याची रवानगी गढवा कारागृहात केली. (Husband kills wife and daughter over domestic dispute in Jharkhand)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें