तीन मुलांच्या आईवर टॅक्सीचालकाचा जीव जडला, महिलेने सोबत येण्यास नकार देताच केले ‘असे’ कृत्य

टॅक्सी चालकाची एक विवाहित महिलेशी ओळख झाली. मग ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले, त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध जुळले. पण हे संबंध महिलेला महागात पडले.

तीन मुलांच्या आईवर टॅक्सीचालकाचा जीव जडला, महिलेने सोबत येण्यास नकार देताच केले 'असे' कृत्य
अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 5:12 PM

दिल्ली : तीन मुलांच्या आईवर टॅक्सी चालकाचा जीव जडला होता. पण महिला आपल्या पती आणि तीन मुलांना सोडून त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. यामुळे टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याची घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी टॅक्सी चालकाला अटक केली आहे. शिव शंकर मुखिया असे आरोपीचे नाव आहे. आरोपीही विवाहित असून त्याला चार मुले आहेत. आरोपी आणि पीडितेची तीन वर्षापूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर आरोपी तिला खर्चासाठी पैसे द्यायचा.

महिला पतीला सोडून येण्यास तयार नव्हती

पीडित महिला आपल्या पती आणि मुलांसोबत राहत होती. तिचा पती मिळेल काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आरोपी गेल्या काही महिन्यांपासून महिलेकडे लग्नासाठी तगादा लावत होता. तसेच पतीला सोडण्यास सांगत होता. मात्र महिलेने पती आणि तीन मुलांना सोडून त्याच्याकडे येण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या शिवशंकरने आधी परिसरात महिलेचे अश्लील पोस्टर लावले.

शवविच्छेदन अहवालात जखमी आढळल्या

यानंतर आरोपीने महिलेला तिच्या घरातच संपवले. महिलेचा पती घरी आल्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्यावर आणि तोंडात जखमी आढळल्या.

हे सुद्धा वाचा

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक

यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, महिलेचे फोन रेकॉर्ड तपासले असता आरोपीबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला दक्षिण दिल्लीतील चिराग दिल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्याने गु्न्ह्याची कबुली दिली.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.