तिचा सुखी संसार सुरू होणार होता, पण बापाच्या हट्टाला तिने नकार दिला आणि नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

बापाला दारुचे व्यसन असल्याने नोकरी करुन तरुणी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. तरुणीचे लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र लग्न होण्याआधीच घरावर शोककळा पसरली.

तिचा सुखी संसार सुरू होणार होता, पण बापाच्या हट्टाला तिने नकार दिला आणि नंतर समोर आला धक्कादायक प्रकार
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून बापाने मुलीला संपवले
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 3:47 PM

मधेपुरा : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका बापाने आपल्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना बिहारमधील मधेपुरा येथे घडली आहे. पित्याने गोळ्या झाडून मुलीची हत्या केली. जिल्ह्यातील सिंहेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्रा टोला येथे ही घटना घडली आहे. शिवराम साह असे आरोपी पित्याचे नाव आहे. शिवरामने दारुसाठी आपल्या 24 वर्षीय मुलीच्या डोक्यात गोळी झाडली. मयत तरुणी दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करत होती आणि लग्नासाठी गावी आली होती. मात्र सुखी संसाराची स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचा दुर्दैवी अंत झाला.

आरोपी शिवराम हा मद्यपी होता. त्यामुळे त्याची 24 वर्षाची मुलगी दिल्लीत काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. तरुणीचे लग्न ठरले आहे. मे महिन्यात तिचे लग्न होणार होते. लग्नाची सर्व तयारी करुन तरुणी बिहारमधील आपल्या गावी गेली. लग्नापूर्वी ती घर बांधत होती. तर पिता नेहमी दारुसाठी पैसे मागायचा.

दारूच्या नशेत मुलीची हत्या

घटनेच्या दिवशीही शिवराम साह हा आपल्या मुलीच्या नवीन घरी दारू पिण्यासाठी पैसे मागण्यासाठी गेला होता. मात्र मुलीने पैसे न दिल्याने त्याचा मुलीशी वाद झाला. घरातील सदस्यांना तो शिवीगाळ करू लागला, त्यानंतर तरुणीने त्याला समज देऊन झोपायला पाठवले. यानंतर शिवराम तिथून परत गेला आणि रात्री एका माणसासोबत परतला. त्या व्यक्तीने तोंडाला स्कार्फ गुंडाळला होता. तो तरुणीशी बोलू लागला आणि नंतर तिच्या डोक्यात गोळी झाडून मोटारसायकलवरून पळून गेला.

हे सुद्धा वाचा

थोड्या वेळाने गोळीबाराचा आवाज आला. गोळीचा आवाज ऐकून घरचे धावत आले. कुटुंबीयांनी तिला गावकऱ्यांच्या मदतीने मधेपुरा येथील जन नायक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.