AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच महिन्यांपूर्वीच लग्न, पण दोघांचं एक क्षणही पटत नव्हतं, मग तरुणाने भररस्त्यात पत्नीवर…

दोघांचे नवीन लग्न झालं होतं. पण दोघांचे एकमेकाशी अजिबात पटत नव्हते. दोघेही एकमेकांशी खूप भांडायचे. अखेर पतीने जे केलं ते पाहून दोघांच्याही घरच्यांना धक्का बसला.

पाच महिन्यांपूर्वीच लग्न, पण दोघांचं एक क्षणही पटत नव्हतं, मग तरुणाने भररस्त्यात पत्नीवर...
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
| Updated on: Jul 01, 2023 | 1:52 PM
Share

मुझफ्फरनगर : पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत होते. अखेर हे भांडण विकोपाला गेले आणि 0. यानंतर पतीने स्वतः जीवन संपवले. पत्नी रक्त्याच्या थारोळ्यात वेदनेने विव्हळत रस्त्यात पडली होती. पण रस्त्यावर जमलेले लोक तिला मदत करण्याऐवजी मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते. नसीम असे पतीचे नाव असून, नर्गिस असे पत्नीचे नाव आहे. दोघांचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र दोघांचे अजिबात पटत नव्हते. दोघेही एकमेकांशी सारखे भांडायचे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तसेच घटनेत वापरलेली बंदुकही जप्त केली आहे.

लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीला भेटायला गेले होते जोडपे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही जोडपे लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीला भेटायला गेले होते. तेथेही दोघांचे भांडण झाले. मात्र तो मध्यस्थीही त्यांची मदत करु शकला नाही. यावेळी त्यांचा आवाज ऐकून आलेल्या मध्यस्थीच्या शेजाऱ्यावरही नसीमने गोळ्या झाडल्या आणि यानंतर जोडपे तेथून बाईकवरुन निघाले. त्यानंतर काही अंतरावर जाऊन त्याने बाईक थांबवली आणि त्याने बंदुक काढून नर्गिसवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःही जीवन संपवले.

तरुणी वेदनेने विव्हळत होती, लोक व्हिडिओ बनवत होते

गोळीबारानंतर जखमी नर्गिस रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. वेदनेने विव्हळत पडलेल्या नर्गिसला मदत करण्याची तसदी कुणीही घेतली नाही. ती वेदनेने मदतीसाठी ओरडत होती आणि उपस्थित लोक तिचा व्हिडिओ बनवत होते. यानंतर जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.