वरात पाहायला गेला नवरा, घरी येऊन बायकोचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला; तेवढ्यात…
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नाची वरात पाहायला गेलेला पती घरी येताच पत्नीला लटकलेले पाहिले. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो सुटकेसमध्ये टाकला. पण तेवढ्यात....

उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, जो आपल्या पत्नीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये टाकून निघाला होता. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह लाल रंगाच्या सूटकेसमध्ये पॅक केला होता. त्याने मृतदेह घरात लपवला होता आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता. पण पोलिस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक झाली.
ही घटना शहाजहानपूरच्या पक्का कटरा मोहल्ल्यातून समोर आली आहे. तेथे अशोक कुमार नावाची व्यक्ती आपल्या पत्नीचा मृतदेह लाल सूटकेसमध्ये घेऊन निघाली होती. अशोकची पत्नी इतरांच्या घरी काम करायची. शनिवारी रात्री सविताने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने दरवाजाच्या चौकटीला आपल्या ओठणीने गळफास बनवला आणि जीव दिला. जेव्हा सविताने आत्महत्या केली, तेव्हा अशोक घरी नव्हता. वाचा: पाकिस्तानी एजंट ज्योती मल्होत्रा महिन्याला किती पैसे कमावयची?
पत्नीने केली होती आत्महत्या
अशोकच्या ३५ वर्षीय पत्नीचे नाव सविता होते. जेव्हा सविताने आत्महत्या केली, तेव्हा अशोक घरी नव्हता. तो त्या वेळी परिसरात निघालेली एक वरात पाहण्यासाठी गेला होता. घरी परतल्यावर त्याला धक्काच बसला. सविता ओठणीने गळफास घेऊन लटकत होती. अशोकने तिला खाली उतरवले, पण तोपर्यंत सविता मृत्यू पावली होती. यामुळे अशोक घाबरला आणि त्याने सविताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला.
मृतदेह सूटकेसमध्ये पॅक केला
अशोकने सविताच्या आत्महत्येची माहिती आपला लहान भाऊ अनिलला दिली. अशोकचा भाऊ अनिल बरेलीमध्ये राहतो. त्याने भावाला फोन करून सविताने आत्महत्या केल्याचे सांगितले आणि विचारले की आता मी काय करू? अनिलने अशोकला थोड्या वेळाने फोन करण्याचे सांगून फोन ठेवला. त्यानंतर अनिलने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. जेव्हा भावाचा बराच वेळ फोन आला नाही, तेव्हा अशोकने पत्नीचा मृतदेह सूटकेसमध्ये पॅक केला आणि त्याची व्हिलेवाट लावण्याचा विचार केला. पण तो घराबाहेर पडणार तेवढ्यात पोलिस आले. पोलिसांनी अशोकच्या हातातील सूटकेस घेतली आणि त्याला ताब्यात घेतले.