AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर…आरोपीच्या क्रौर्याने काळजाचा उडेल थरकाप

न्यायालय परिसरात उपस्थित लोकांनी या निर्णायकडे महिला सुरक्षा आणि न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल म्हणून पाहिलं. असे निर्णय समाजात भय निर्माण करतील. पुढे कुठला गुन्हेगार असा गुन्हा करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल असं स्थानिक नागरिक म्हणाले.

काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर...आरोपीच्या क्रौर्याने काळजाचा उडेल थरकाप
husband sentenced to death for wife murder
| Updated on: Aug 31, 2025 | 5:58 PM
Share

‘तू काळी आहेस, ही क्रीम तुला गोरी बनवेल….’ असं म्हणून पत्नीच्या संपूर्ण शरीराला अॅसिड असलेलं केमिकल लावलं. त्यानंतर जळत्या अंगरबत्तीने तिला चटके दिले. अॅसिड आधीपासूनच असल्यामुळे आग वेगाने भडकली. महिलेच संपूर्ण शरीर त्या आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळलं. काहीवेळातच महिलेचा मृत्यू झाला. 24 जून 2017 च्या रात्री जे झालं, त्याच्या आठवणीने आजही उदयपूरच्या लोकांचा थरकाप उडतो. आता कोर्टाने या प्रकरणात दोषी पतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात शनिवारी मावळी अपर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने पत्नीच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या किशन लालला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोषीला 50 हजार रुपये दंडही सुनावला.

तिला काळी-जाडी म्हणून अपमानित करायचा

समाजाला हादरवून सोडणारं हे प्रकरण आहे. दोषी किशन दास पत्नी लक्ष्मीला तिच्या रंगरुपावरुन टोमणे मारायचा. तिला काळी-जाडी म्हणून अपमानित करायचा. त्रास द्यायचा. पत्नीच रुप त्याच्या डोळ्यांना इतकं खटकत होतं की, एकदिवस त्याने तिची हत्याच करुन टाकली.

पत्नीच्या पोटाला जळत्या अगरबत्तीचे चटके

घटनेच्या एकदिवस आधी आरोपीने पत्नीला कपडे काढायला लावले. तिच्या शरीरावर केमिकलसदृश्य क्रीम लावली. आरोपीने सांगितलं की, ही क्रीम लावल्यानंतर तू गोरी होशील. पण त्या रसायनाला Acid सारखा वास येत होता. त्यानंतर पत्नीच्या पोटाला जळत्या अगरबत्तीने चटके दिले. बघता, बघात लक्ष्मीच संपूर्ण शरीर आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळलं गेलं. जागीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

या परिसरात दहशत पसरली होती

या भयानक हत्याकांडानंतर या परिसरात दहशत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी पक्षाकडून दिनेश चंद्र पालीवाल यांनी न्यायालयात मजबूत बाजू मांडली. सरकारी पक्षाने आरोपी विरोधात 14 साक्षीदार आणि 36 कागदोपत्री पुरावे सादर केले. युक्तीवादादरम्यान पालीवाल यांनी कोर्टाकडे मागणी केली की, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. समाजात स्पष्ट संदेश गेला पाहिजे की, महिलांविरोधात हिंसाचार आणि क्रूरता सहन केली जाणार नाही.

आत्म्याला हलवून सोडणारं हे कृत्य

पीठासीन अधिकारी न्यायाधीश राहुल चौधरी यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल सुनावला. हा अपराध केवळ महिलेच्या हत्येपुरता मर्यादीत नाही, आत्म्याला हलवून सोडणारं हे कृत्य आहे. अशा व्यक्तीच पूनर्वसन शक्य नाही. म्हणून त्याला मृत्यूदंड दिला जातोय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.