AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murder Video : हैदराबादमध्ये भररस्त्यात खूनी खेळ, मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलाची हत्या, मुलीच्या भावाचा क्रूरपणा

सरुरुनगरमध्ये नागराजू नावाच्या तरुणाची त्याच्या मेव्हणाने भर रस्त्यात मारहाण करुन हत्या केली आहे. नागराजूवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, त्याला मारहाण करण्यात आली, त्यानंतर चाकूने भोकसून त्याची हत्या करण्यात आली.

Murder Video : हैदराबादमध्ये भररस्त्यात खूनी खेळ, मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलाची हत्या, मुलीच्या भावाचा क्रूरपणा
हैद्राबादेत भररस्त्यात 'सैराट'ची पुनरावृत्तीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 05, 2022 | 7:59 PM
Share

हैदराबाद – मुस्लीम तरुणीशी (Muslim Girl) हिंदु तरुणाने विवाह (Hindu Muslim Marriage) केल्यानंतर तरुणाचा भर रस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादेत(Hydrabad Crime) घडली आहे. सरुरुनगरमध्ये नागराजू नावाच्या तरुणाची त्याच्या मेव्हणाने भर रस्त्यात मारहाण करुन हत्या केली आहे. नागराजूवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, त्याला मारहाण करण्यात आली, त्यानंतर चाकूने भोकसून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिासंनी दोघांना अटक केली आहे. भररस्त्यात रहदारी असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला. नागराजू त्याची पत्नी सुल्तानाला सोबत घेऊन बाईकवरुन सरुरनगरकडे चालला होता. त्यावेळी तहसीलदार कार्यालयाजवळ दोघांनी लोखंडी रॉड आणि चाकुने नागराजूवर हल्ला केला. नागराजूच्या पत्नीसमोरच त्याची हत्या करण्यात आली. नागराजूच्या परिवाराने सुल्तानाच्या कुटुंबीयांविरोधात हत्येचा आरोप केला आहे. तर हिंदू संघटनांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, पोलीस आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे.

तरुणाच्या हत्येवेळचा व्हिडिओ

आर्य समाज मंदिरात केला होता विवाह

नागपाजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातील मपरपल्ली गावातील रहिवासी होता. तर सुल्ताना त्याच्या शेजारी असलेल्या घानापूर गावात राहत होती. दोघेही सात वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र या लग्नाला सुल्तानाच्या घरातून विरोध होता. 31 जानेवारीला पळून जाऊन नागराजू आणि सुल्ताना यांनी लाल दरवाजा परिसरात आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर त्याने सुल्तानाचे नाव बदलून पल्लवी असे ठेवले होते.

हत्येनंतरचा व्हिडिओ

दोन आरोपींना अटक

नागराजू एका कार शोरुममध्ये सेल्स मन म्हणून काम करीत होता. ४ महिन्यांपूर्वी त्याने सुल्तानाशी लग्न केले होते. हल्ल्याच्या वेळी सुल्ताना घटनास्थळी उपस्थित होती. तिने आरोप केला आहे की, तिचा भाऊ आणि त्याच्या काही मित्रांनी हा हल्ला केला. सुल्तानाचा भाऊ आणि भावोजीला या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत बिलासपुरम नागराजू आणि त्याची पत्नी सुल्ताना हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी या वर्षी जानेवारीत लग्न केले होते. सुल्तानाचे नाव पल्लवी करण्यात आले होते. या लग्नामुळे सुल्तानाचा भाऊ नाराज होता, त्यातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रकरणाच्या चौकशीची भाजपाची मागणी

तेलगंणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांनी या प्रकरणात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. हत्या करणारे परिवारातील सदस्यच होते का, कोणत्या धार्मिक गटाने आरोपींना असे करण्याचा सल्ला दिला होता का, त्यांना कुणी आर्थिक मदतीचे आमिष दाखवले होते का, अशा सर्व एंग्ल्सनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं