AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! IAS ची तयारी करणाऱ्या तरुणीचे बनवले नको ते व्हिडिओ, कॅमेरा अशा ठिकाणी लपवलेला की…

आपलं व्हॉट्स अॅप अकाऊंट दुसऱ्या लॅपटॉपवर ओपन झाल्याच तिच्या लक्षात आलं. तिने तात्काळ लॉगआऊट केलं. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच तिला समजलं.

सावधान! IAS ची तयारी करणाऱ्या तरुणीचे बनवले नको ते व्हिडिओ, कॅमेरा अशा ठिकाणी लपवलेला की...
Spy Camera
| Updated on: Sep 25, 2024 | 12:40 PM
Share

IAS ची तयारी करणाऱ्या एका 30 वर्षीय युवतीच्या वॉशरुम आणि बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा सापडला आहे. सिविल सर्व्हीसची तयारी करणारी ही युवती भाडेकरु म्हणून राहत होती. दिल्लीच्या शाकरपुर भागात ही घटना घडली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहराबाहेर जाताना ही तरुणी तिच्या रुमच्या किल्ल्या जागामालकाचा मुलगा करण याच्याकडे द्यायची. ती घरी नसताना करणने तिच वॉशरुम आणि बेडरुमच्या ब्लबच्या होल्डरमध्ये हा कॅमेरा फिट केला होता. तरुणीला तिच्या व्हॉट्स अॅप अकाऊंटवर काही गडबड होत असल्याच दिसून आलं. त्यानंतर हा सर्व गुन्हा उघड झाला.

आपल व्हॉट्स अॅप अकाऊंट दुसऱ्या लॅपटॉपवर ओपन झाल्याच तिच्या लक्षात आलं. तिने तात्काळ लॉगआऊट केलं. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच तिला समजलं. बाथरुमला गेल्यानंतर ब्लबच्या होल्डरमध्ये तिला स्पाय कॅमेरा आढळून आला. तिने पोलिसांना बोलावल्यानंतर बेडरुममध्ये कॅमेरा सापडला. बाहेर जाताना करणकडे रुमच्या चाव्या देऊन जाते असं सांगितल्यानंतर पोलिसांनी करणची चौकशी केली.

व्हिडिओ कसे ट्रान्सफर केले?

करणने पोलीस चौकशीत कबूल केलं. तरुणी तीन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशला तिच्या घरी गेल्यानंतर त्याने स्पाय कॅमेरे फिट केले. इलेक्ट्रॉनिक मार्केटमधून स्पाय कॅमेरे घेऊन एक बाथरुम आणि दुसरा बेडरुममध्ये फिट केल्याची त्याने कबुली दिली. इलेक्ट्रिकच काम करायच असल्याच सांगून करण महिलेकडे सतत रुमची चावी मागायचा. या बहाण्याने तो रेकॉर्ड केलेले व्हिडिओ मेमरी कार्डद्वारे त्याच्या लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करायचा, असं पोलिसांनी सांगितलं.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.