गावठी कट्टा आणायला लावला, नंतर गोळ्या झाडल्या, अनैतिक संबंध उघड झाल्याने केली पतीची हत्या

| Updated on: Dec 04, 2021 | 11:14 PM

आपल्या मामीशी अवैध संबंध असणाऱ्या आरोपीने स्वत:च्या मामाला गोळ्या झाडून ठार केले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे.

गावठी कट्टा आणायला लावला, नंतर गोळ्या झाडल्या, अनैतिक संबंध उघड झाल्याने केली पतीची हत्या
FIRING AND MURDER
Follow us on

चंदिगढ : हरियाणा राज्यातील पलवल येथील होडल या भागात एक धक्कादायक घटना घडलीय. येथे आपल्या मामीशी अवैध संबंध असणाऱ्या आरोपीने स्वत:च्या मामाला गोळ्या झाडून ठार केले आहे. या हत्याकांडात हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचा पत्नीचादेखील समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. मात्र तब्बल दोन महिनयानंतर पोलिसांनी या आोरपींना अटक केलं आहे.  पोलिसांनी या प्रकरणाच्या तळाशी जाऊन आरोपी भाचा कृष्णकुमार आणि त्याची मामी अशा दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी ताराचंद यांची हत्या केली होती.

अनैतिक संबंध उघड झाल्याने गोळ्या झाडून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा येथील पलवलमधील होडल भागात ताराचंद त्यांच्या पत्नीसोबत वास्तव्यास होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात त्यांची हत्या करण्यात आली होती. याआधी ताराचंद यांचे भाऊ महेश यांनी त्यांचा शोध घेतला होता. बऱ्याच शोधानंतर महेश यांना हसनपूर रोडवर ताराचंद यांची दुचाकी आणि मृतदेह आढळला होता. त्यानंतर आरोपी कृष्णकुमार आणि मृतकाची पत्नी यांनीच माझ्या भावाची म्हणजेच ताराचंद यांची हत्या केल्याचा आरोप महेश यांनी केला होता. या आरोपानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली. सध्या या प्रकरणात दोघांना अटक करण्या आलं आहे. चौकशीदरम्यान आरोपी कृष्णकुमार आणि मृताकीची पत्नी अशा दोघांनी मिळून ताराचंद यांना संपवल्याचे उघड झाले.

खून नेमका का आणि कसा केला ?

आरोपी कृष्णकुमार आणि त्याची मामी यांच्यात अनौतिक संबंध असल्याचं हत्या झालेले ताराचंद यांना समजलं होतं. त्यानंतर या दोघांनी मिळून त्यांना संपवण्याचा कट रचला. त्यासाठी कृष्णकुमारला त्याच्या मामीने 16 हजार रुपये देऊन गावठी कट्टा खरेदी करण्यास सांगितले. मामीने सांगितल्यानुसार कृष्णकुमारने गावठी कट्टा खरेदी करून ताराचंद यांची गोळ्या झाडून हत्या केली.

दोन्ही आरोपींना अटक, गावठी कट्टा हस्तगत

दरम्यान, ताराचंद यांन ठार करुन कृष्णकुमार फरार झाला होता. त्याला आता पोलिसांनी अटक केलं आहे. त्याच्यासोबत ताराचंद यांची पत्नी आणि कृष्णकुमारची मामीला हिला अटक करण्यात आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे.

इतर बातम्या :

Aurangabad: कंपनी संचालकाला 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला अटक, 19 खात्यात पैसे वळवले

भरधाव वेगात गाडी, अचानक समोर बिबट्या आला अन् चंद्रपुरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सुरक्षारक्षकच निघाला ‘चिल्लर चोर,’ मंदिरातून तब्बल 3 हजार रुपये लांबवले