सुरक्षारक्षकच निघाला ‘चिल्लर चोर,’ मंदिरातून तब्बल 3 हजार रुपये लांबवले

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागातून एक तरुण खांद्यावर संशायास्पद वस्तू घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याचा संशय आल्यानं त्याची चौकशी करण्यात आली.

सुरक्षारक्षकच निघाला 'चिल्लर चोर,' मंदिरातून तब्बल 3 हजार रुपये लांबवले
ULHASNAGAR THIEF

ठाणे : मंदिराची दानपेटी फोडून चिल्लर चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी अटक केलीये. अटक केल्यानंतर त्याच्याकडे तब्बल तीन हजारांची चिल्लर सापडली आहे. या चोरट्याचे नाव लालजितकुमार लोधी असं असून त्याला अटक करण्यात आलं आहे. यापूर्वी तो सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा.

खांद्यावर संशयास्पद वस्तू घेऊन जाताना संशय, पोलिसांकडून तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागातून एक तरुण खांद्यावर संशायास्पद वस्तू घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याचा संशय आल्यानं त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्या खांद्यावरील बोचक्यात मोठ्या प्रमाणात चिल्लर नाणी असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यामुळं त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं चालिया मंदिराच्या बाजूच्या छोट्या मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

मंदिर समितीच्या वतीनं चोरट्याविरोधात तक्रार 

लालजितकुमार लोधी असं या 20 वर्षीय चोरट्याचं नाव असून ज्या मंदिरात त्याने चोरी केली, त्याच मंदिरात तो यापूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांना माहिती दिल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं या चोरट्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

चिल्लर मोजण्यात बराच वेळ गेला

दरम्यान, दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत लालजितकुमार लोधी याला अटक केलं असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. मात्र त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली चिल्लर मोजण्यात पोलिसांचा चांगलाच वेळ गेला.  7 ते 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून ही चिल्लर मोजली. अखेर ही चिल्लर 3 हजार रुपयांची असल्याचं स्पष्ट झालं.

इतर बातम्या :

शिवीगाळ, विनयभंगाबाबत चौकशी करा, यशवंत जाधवांच्या भाडोत्री गुंडावर गुन्हा नोंदवा; भाजप नगरसेविकांची मागणी

Ramnath Kovind : हेलिपॅडला विरोध, राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार! संभाजीराजेंचं ट्विट

Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!


Published On - 6:13 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI