Pune Crime| पुण्यात नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या अंगठी चोर महिलेला अटक ; चोरीची पद्धत ऐकून पोलीसही हैराण

महिलेले पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीहीची मदत घेतली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी विविध ज्वेलर्स अंगठ्याची चोरी करणारी महिला एकच असल्याची प्रथम खात्री केली. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अंगठी चोरणारी पूनम असल्याचे सिद्ध झालं .

Pune Crime| पुण्यात नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या अंगठी चोर महिलेला अटक ; चोरीची पद्धत ऐकून पोलीसही हैराण
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या

पुणे – शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरु आहे. अशातच हडपसर पोलिसांनी शहरातील नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या महिलेला अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे संबंधित महिलेने चंदुकाका सराफ अँड सन्स, पुन. ना. गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार ब्ल्यु स्टोन या नामांकित ज्वेलर्समध्ये अंगठी खरेदीच्या बहाण्याने चोरी केल्याच्या समोर आले आहे. चोरी करणाऱ्या महिलेचे नाव पुनम परमेश्वर देवकर(वय 42, रा. बिबवेवाडी) असून , तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशी करायची चोरी

पूनम सराफ दुकानात जात असे. तिथे गेल्यानंतर ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगत. कधी पाणी व चहाची मागणी करुन सेल्समनचे लक्ष विचलित करीत.सोन्याच्या अंगठ्या दाखविण्यास सांगत त्यानंतर सोन्याच्या अंगठी ऐवजी बनावट अंगठी तिथे ठेवत असे. ट्रे मध्ये असलेल्या अंगठ्या सर्व जागेवर दिसत असल्याने तिची ही चोरी लवकर समजत नसे. काही दिवस गेल्यानंतर दागिन्यांची पाहणी करीत असताना घडलेला प्रकार,  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आल्यावर फसवणूक केल्याचे सराफांच्या लक्षात येत.

सीसीटीव्ही च्या मदतीने पकडली चोरी दरम्यान शहरातील विविध ज्वेलर्सनी तिच्या विरोधात अंगठी चोरी केल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र या महिलेले पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीहीची मदत घेतली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी विविध ज्वेलर्स अंगठ्याची चोरी करणारी महिला एकच असल्याची प्रथम खात्री केली. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अंगठी चोरणारी पूनम असल्याचे सिद्ध झालं . त्यानंतर तिचे फोटो व फुटेज सर्व पोलीस स्थानकात पाठवण्यात आले. या माहितीच्या आधारे ही महिला सराफी दुकानांसमोरुन मॉलकडे जात असताना पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक तपास केला असता तिने चोरीची कबुली दिली. आरोपीने आतापर्यंत शहरातील वेगवेगळ्या दुकानात चोरीच्या 12 घटना उघडकीस आल्या आहेत. तर पोलिसांनी तिच्याकडून तब्बल 6 लाख 23 या हजारांच्या 12 सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या आहेत. या चोऱ्या कोथरूड, हडपसर, बिबवेवाडी येथे करण्यात आल्या होत्या.

आधी सराफ दुकानात करायची काम आरोपी पूनम ही2005 -06  शहरातील एका सराफ दुकानात सेल्समन म्हणून काम करायची. तिथे काम करता असताना महिलेने चोरी केल्याने तिच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सराफ दुकानात काम करण्याचा अनुभव असल्याने चोरी करण्यास सोपे जात होते. चोरी करताना सोन्याच्या दागिन्यांवर स्टिकर कसे लावायचे हे तिला माहिते होते . त्याचाच फायदा चोरी करताना ती घेत असे.

Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना

Video: बटाटे कापणाऱ्या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्यावर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर अमिनाचीच चर्चा!

फेसबुक फ्रेण्डकडून हॉटेल रुममध्ये बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करत 10 लाखांची मागणी

Published On - 10:00 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI