AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहेरी आलेल्या बहिणीसोबत लहान बहिणीचा वाद झाला, मग जे घडले त्याची कुणीच कल्पना केली नसेल !

तरुणी माहेरी रहायला आली होती. यावेळी तरुणीचा लहान बहिणीसोबत वाद झाला. मग या वादाने भयंकर रुप पहायला मिळाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

माहेरी आलेल्या बहिणीसोबत लहान बहिणीचा वाद झाला, मग जे घडले त्याची कुणीच कल्पना केली नसेल !
क्षुल्लक वादातून बहिणीने बहिणीला संपवले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 30, 2023 | 11:02 AM
Share

अकोला : माहेरी आलेल्या बहिणीची लहान बहिणीनेच क्षुल्लक कारणातून निर्घृण हत्या केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसात आरोपी बहिणीविरोधात कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. बहिणींमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

वादातून बहिणीवर जीवघेणा हल्ला

जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडका गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मयत तरुणी आपल्या माहेरी आली होती. यावेळी तिचा लहान बहिणीसोबत काही कारणातून वाद झाला. यानंतर बहिणीने भाजी चिरायचा चाकू घेऊन बहिणीवर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. घरच्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आरोपी मानसिक रुग्ण

घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. आरोपी बहिणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी मानसिक रुग्ण असून, तिचा इलाज सुरु असल्याची माहिती मिळते. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तपासाअंतीच सर्व सत्य उघड होईल.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा