Crime: लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतला; कारण ऐकून पोलिसही शॉक झाले

शेतात जाणारा रस्ता अडवल्याच्या कारणावरून धाकट्या भावाने थोरल्या भावाला कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला आहे. मयत तायाप्पा सोमा मोटे यांनी आरोपी धाकटा भाऊ रामाला तु शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडके आढवे का टाकले आहे असे विचारले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.

Crime: लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतला; कारण ऐकून पोलिसही शॉक झाले
नवी मुंबईतील धक्कादायक प्रकारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 8:40 PM

बारामती : लहान भावाने मोठ्या भावाचे हत्या(Murder) केल्याची धक्कादायक घटना बारामतीत(Baramati) घडली आहे किरकोळ वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारी झाली दोघा भावांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केला मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या हत्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लहान भाऊ यात गंभीर जखमी झाला आहे.

बारामती तालुक्यातील मोढवे हद्दीतील मोटेवस्ती येथे हे हत्याकांड घडलेआहे. तायाप्पा सोमा मोटे मृत व्यक्तीचे नाव आहे. रामा मोटे असे जखमी झाालेल्या वक्तीचे नाव आहे. मयत तायाप्पाची सुन लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तायाप्पा हा रामाचा मोठा भाऊ आहे.

शेतात जाणारा रस्ता अडवल्याच्या कारणावरून धाकट्या भावाने थोरल्या भावाला कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला आहे. मयत तायाप्पा सोमा मोटे यांनी आरोपी धाकटा भाऊ रामाला तु शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडके आढवे का टाकले आहे असे विचारले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यांच्यात वाद सुरु असताना कुणीङी भांडण सोडवायला पुढे आले नाही. दोघांनिी एकमेकांवर कुऱ्हाडीने घाव घातले. यामध्ये तायाप्पाच्या डोक्यात घाव बसल्याने मृत्यू झाला. तर रामाच्या पायावर घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

बारामती येथील खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असल्याची  माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान  उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेले परिस्थिती बाबत पंचनामा नोंदवला.

हल्लेखोर रामा यात जखमी झाल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्याला अटक करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोघा भावांमध्य मागील अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे.  त्यांच्यात अनेकदा भांडण आणि हाणामारी झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगीतले. मात्र, घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.