आधी उधारीवर जेवण केले, मग हॉटेलमालकाच्या पत्नीची चैन खेचली, घटना सीसीटीव्हीत कैद

हॉटेलमधील जेवणाचे उधारीचे पैसे हॉटेल मालकाने मागितले. मात्र आरोपींना पैसे मागितल्याचा राग आला. यानंतर आरोपींनी नीचपणाची सीमाच ओलांडली.

आधी उधारीवर जेवण केले, मग हॉटेलमालकाच्या पत्नीची चैन खेचली, घटना सीसीटीव्हीत कैद
बुलढाण्यात उधारीचे पैसे मागितले म्हणून हॉटेल मालकाला मारहाणImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 8:31 PM

संदीप वानखेडे, TV9 मराठी, बुलढाणा : उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करून त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अनिल शेषराव पैठणे असे पीडित हॉटेल मालकाचे नाव आहे. रविंद्र भास्करराव पाटील, यश रविंद्र पाटील, प्रेम अरुण पाटील, संदीप मनोहर जाधव आणि सोपान जाधव अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

काय घडले नक्की?

कोलवड येथील अनिल शेषराव पैठणे यांचे बुलढाणा-धाड मार्गावर हॉटेल आणि बिअर बार आहे. त्याठिकाणी रविंद्र भास्करराव पाटील, यश रविंद्र पाटील, प्रेम अरुण पाटील, संदीप मनोहर जाधव आणि सोपान जाधव यांच्याकडे हॉटेल मालकाने मागील उधारीचे पैसे मागितले. यावेळी आरोपींनी हुज्जत घालत लोखंडी पाईपने मारहाण सुरू केली.

दरम्यान, फिर्यादीची पत्नी आणि मुलगा भांडण सोडण्यासाठी आले असता आरोपींनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपी फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

गोंदियातही उधारीचे पैसे मागितल्यावर पेट्रोलपंप चालकाला मारहाण

पेट्रोलचे उधारीचे पैसे मागायला गेलेल्या पेट्रोल पंप चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गोंदियातील देवरी शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. या मारहाणीत पेट्रोल पंप चालक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संदीप सिंह असे पीडित व्यक्तीचे नाव आहे, तर सुरेश शाहू आणि शुभम शाहू अशी आरोपी काका-पुतण्याची नावे आहेत.

Non Stop LIVE Update
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.