क्षुल्लक कारणातून घरात घुसून कुटुंबाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरुन टोळक्याने जे केले ते पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

क्षुल्लक कारणातून घरात घुसून कुटुंबाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
क्षुल्लक कारणातून कुटुंबाला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 12:11 PM

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोटारसायकलला धडक दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन घरात घुसून कुटुंबाला मारहाण आणि भांडण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौघांविरोधात भादवी 452 ,427 ,323 ,504 ,506 आणि 34 कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित कुटुंब आणि आरोपी चेंबूरमधील विष्णुनगर परिसरात राहतात. एका आठवड्यापूर्वी पीडितांच्या मुलाने दुसऱ्या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाच्या मोटारसायकलला धडक झाली होती. त्यानंतर त्या मुलाने त्याच्या मित्रांना एकत्र केले आणि पीडित कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केली. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पीडितांच्या घराबाहेर 20 ते 25 जण जमा झाले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

यानंतर पीडित कुटुंबाने आरसीएफ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरुन आरसीएफ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

जळगावमध्येही घरात घुसून कुटुंबाला मारहाण

घरात घुसून काही महिला आणि पुरुषांना जमावाकडून मारहाण केल्याची घटना समोर येत आहे. या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील असल्याचे समजते. मारहाण करणारे हे एकमेकांचे नातेवाईक असून, याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दिल्याने संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.