AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा पहिलाच गुन्हा नाही… लोकलमध्ये तरूणीवर अत्याचार करणाऱ्याने त्याच दिवशी इतर महिलांसोबतही..

मुंबई लोकलमध्ये तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सराईत बदमाश आहे. हा काही त्याचा पहिला गुन्हा नाही. यापूर्वीही त्याने इतर अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे.

हा पहिलाच गुन्हा नाही... लोकलमध्ये तरूणीवर अत्याचार करणाऱ्याने त्याच दिवशी इतर महिलांसोबतही..
| Updated on: Jun 16, 2023 | 1:22 PM
Share

मुंबई : धावत्या लोकलमध्येच एका नराधमाने एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान ही घटना घडली असून पोलिसांनी अवघ्या आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नवाजू करीम शेख (वय 40) असे त्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे , हा त्याचा पहिलाच गुन्हा नाहीये.

नवाजूने गुन्ह्याच्याच दिवशी इतर अनेक महिलांना त्रास देत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रय्तन केल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे सीएसएमटी स्टेशनवर भर गर्दीत हा प्रकार घडला असून कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि ज्या महिलांना हा त्रास सहन करावा लागला, त्यांनीही समोर येऊन त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली नाही.

यांसदर्भातील सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्यात नवाजूचे कारनामे स्पष्टपण दिसत आहेत. कामाला निघालेल्या महिलांसोबत त्याने दिवसाढवळ्या गैरवर्तन केल्याचेही समोर आले आहे. पण विषण्ण करणारी बाब म्हणजे हे सर्व होत असताना कोणीच त्याला रोखण्याचा वा जाब विचारण्याचा प्रयत्न केला नाही. उलट सगळेजण दुर्लक्ष करून पुढे निघून गेले.

त्या दिवशी काय घडलं ?

मिळालेल्या मााहितीनुसार, पीडित तरूणी गिरगाव येथील रहिवासी असून घटनेच्या दिवशी ती नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. परीक्षा देण्यासाठी तिने 7.26 ची लोकल पकडली. सकाळच्या वेळेत महिलांच्या डब्यात कोणीच नव्हतं. नवाजूने स्टेशनवरूनच त्या मुलीचा पाठलाग केला आणि तिच्यामागोमाग लोकलमध्ये चढला. त्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने त्याला कडाडून विरोध केला. तेवढ्यात ट्रेन मस्जिद स्थानकात पोहोचली आणि त्या मुलीने लोकलमधून उडी मारली व ती जनरल डब्यात चढली. नवाजूही लगेच महिलांच्या डब्यातून खाली उतरला व मस्जिद स्थानकावर रेंगाळू लागला.

आणखी महिलांशी केले दुष्कृत्य

त्या मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजची आणखी तपासणी करण्यात आली. तेव्हा असे दिसून आले की, दारूच्या नशेत असलेल्या करीमने इतर पाच महिलांसोबतही गैरवर्तन केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोणत्याही प्रवाशाने, सुरक्षा कर्मचार्‍यांना या लज्जास्पद घटनेची माहिती दिली नाही. उघड्यावर फिरणाऱ्या या मॉलेस्टरने अनेक महिलांना त्रास दिला. या संदर्भातील व्हिडीओही समोर आला असून सीएसएमटी स्थानकावर तो (नवाजू) एका महिलेला जाणूनबुजून कोपराने ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. तर दुसऱ्या एका क्लिपमध्ये तो स्टेशनवर तिरका तिरका चालत मुद्दाम एका मुलीच्या रस्त्यात आडवा आला व तिला धडकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तिथून तो लगेचच सटकला. त्या मुलीच्या मागेच एक पुरूष प्रवासी होता, त्याने हा सर्व प्रकार बघितला, पण काहीच न करता तो सरळ पुढे निघून गेला.

त्याच्या दुष्कृत्याचे असे आणखी काही व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र त्याने ज्या महिलांना त्रास देण्याचा अथवा त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी कोणीच पुढे येऊन याची तक्रार नोंदवली नाही. आरोपीने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरही दोन इतर महिला प्रवाशांच्या मार्गात हेतुपुरस्सर अडथळा आणला, परंतु त्यांनी देखील या प्रकरणाची तक्रार न करणे पसंत केले आणि पुढे निघून गेल्या.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.