AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पत्नीचा अपघात केला, मग गळा आवळला; महिलेने असा काय गुन्हा केला की पतीच जीवावर उठला?

अपघातात प्रमिला वाचली होती आणि तेथून तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिचा पती अर्जुनने तिला पकडले आणि ओढणीने गळा आवळून संपवले. अर्जुनने पोलीस चौकशीत सर्व गुन्ह्याची कबुली दिली.

आधी पत्नीचा अपघात केला, मग गळा आवळला; महिलेने असा काय गुन्हा केला की पतीच जीवावर उठला?
स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यूImage Credit source: Google
| Updated on: Feb 28, 2023 | 10:12 AM
Share

जशपूर : चारित्र्यावर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीचा पतीने अत्यंत भयानक पद्धतीने काटा काढल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडमध्ये उघडकीस आली आहे. हत्येचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पत्नीचा अपघाती मृत्यू घडवण्याचा कट रचला. मात्र हा कट फसल्याने आरोपी पतीने पत्नीचा गळा आवळला. यानंतर कार दरीत ढकलून अपघातचा बनाव केला. पण महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर सर्व सत्य उघड झाले आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. प्रमिला यादव असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या दोन पुतण्यांना अटक केली आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. जसपूर जिल्ह्यातील बगीचा पोलीस ठाण्यांतर्गत पनडारापाठ परिसरात ही घटना घडली.

कार अपघातात काकीचे निधन झाल्याचा बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला संदीप यादवने अपघाताची तक्रार नोंदवली होती. पहाटे 5 च्या सुमारास संदीपची काकी शंकरगडच्या जगीमा येथे आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली होती. ती ज्या कारमधून जात होती, ती कार पवन यादव चालवत होता. कामारीमा घाटाजवळ कारचे ब्रेक फेल झाल्याने कार दरीत कोसळली. यात आपल्या काकीचा मृत्यू झाल्याचे संदीपने पोलिसांना सांगितले.

महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सत्य उघडकीस

संदीपने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घाटातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्रथमदर्शनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरु करण्यात आला. मात्र महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला आणि पोलीसही चक्रावून गेले. शवविच्छेदन अहवालात हा अपघात नसून घातपात असल्याचे उघड झाले.

पत्नी वारंवार चारित्र्यावर संशय घ्यायची म्हणून संपवले

यानंतर पोलिसांनी महिलेचा पती अर्जुन यादव आणि कार चालक पवन यादव या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. प्रमिला यादव पतीच्या चरित्र्यावर वारंवार संशय घ्यायची. यामुळे तिच्या स्वभावाला कंटाळून तिला संपवण्याचा कट रचल्याचे आरोपी पतीने पोलिसांना सांगितले.

प्रमिलाला कारमध्ये बसवून कामारीमा घाटाजवळ कार नेण्यात आली. ही कार अर्जुन चालवत होता. त्याने हळूहळू दरीच्या दिशेने कार वळवत स्वतः उडी घेतली. त्यानंतर एकापाठोपाठ एक आधी पवन आणि नंतर अलोक यादव यांनीही कारमधून उड्या घेतल्या. त्यानंतर कार 25 फूट खोल दरीत जाऊन कोसळली.

अपघातात वाचली म्हणून गळा आवळला

या अपघातात प्रमिला वाचली होती आणि तेथून तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिचा पती अर्जुनने तिला पकडले आणि ओढणीने गळा आवळून संपवले. अर्जुनने पोलीस चौकशीत सर्व गुन्ह्याची कबुली दिली. अपघातानंतर आरोपी पवन यादवने त्याच्या काकीच्या माहेरी फोन केला आणि रस्त्यावर झालेल्या अपघातात प्रमिला यादवचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पवन आणि संदीपने स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची तक्रार नोंदवली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.