AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीला प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहून पतीला संताप अनावर, पुढे जे घडले ते कल्पनेपलिकडचे !

पतीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. पतीला या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्याने दोघांनाही समज दिली होती. मात्र तरीही पत्नीचे प्रेमप्रकरण सुरुच होते.

पत्नीला प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहून पतीला संताप अनावर, पुढे जे घडले ते कल्पनेपलिकडचे !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 15, 2023 | 4:20 PM
Share

रांची : पती घरी नसताना पत्नीचा प्रियकर घरी यायचा. मात्र अखेर त्यांची चोरी पकडली गेली आणि पत्नीला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीला संताप अनावर झाला. संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्ल्यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. नामजान बरला असे मयत पतीचे नाव आहे. गावातील लोकांनी अंगणात रक्ताने माखलेला मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

आरोपीला अटक

डॉग स्कॉडच्या मदतीने पोलिसांनी गावातील एका घरातून आरोपीला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी गावातच एका घरात लपून बसला होता. अमृत होरो असे आरोपी पतीचे नाव आहे. बंडूच्या लापुंग पोलीस स्टेशन हद्दीतील सारंगलोया गावात ही खळबळजनक घटना घडली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

नामजानचे आणि आरोपीच्या पत्नीचे प्रेमसंबंध सुरु होते. अमृत घरी नसताना नामजन त्याच्या पत्नीला भेटायला घरी यायचा. अमृतला प्रेमसंबंधाची माहिती मिळताच त्याने दोघांनाही समज दिली होती. मात्र दोघेही ऐकत नव्हते. एक दिवस अमृत घरी आला असता त्याने पत्नीला आणि नामजनला बेडवर नको त्या अवस्थेत पाहिले. यानंतर त्याला संताप अनावर झाला आणि त्याने हा विषय कायमचाच संपवला. पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी