अनैतिक संबंधात पत्नी ठरत होती अडथळा; मेहुणीच्या मदतीने आधी तिला संपवले, मग आत्महत्येचा बनाव केला पण…

काही वर्षांपूर्वी रशीद खान आणि मीना बानो यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर एक वर्ष सर्व सुरळीत चालू होते. मात्र त्यानंतर रशीद मेहुणीच्या संपर्कात आाला आणि त्यांच्या संसारात वाद होऊ लागले.

अनैतिक संबंधात पत्नी ठरत होती अडथळा; मेहुणीच्या मदतीने आधी तिला संपवले, मग आत्महत्येचा बनाव केला पण...
अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा काढला काटा
Image Credit source: CRIME
| Updated on: Jan 23, 2023 | 11:08 PM

टीकमगड : मेहुणीच्या प्रेमात वेडा झालेल्या पतीने तिच्याच मदतीने पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील टीकमगडमध्ये उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पकडले जाऊन नये म्हणून आरोपींनी आत्महत्येचा बनाव केला. मात्र हत्येचा उलगडा होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रशीद खान असे आरोपी पतीचे नाव आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. विशेष म्हणजे या हत्याकांडात महिलेच्या सख्ख्या बहिणीचाही समावेश असल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी रशीद खान आणि मीना बानो यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर एक वर्ष सर्व सुरळीत चालू होते. मात्र त्यानंतर रशीद मेहुणीच्या संपर्कात आाला आणि त्यांच्या संसारात वाद होऊ लागले.

एकदा रशीद मीनाला सासरवाडीत सोडायला गेला होता. यावेळी त्याची भेट मेहुणीशी झाली. पाहत क्षणीच तो मेहुणीच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याबाबत मीनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले.

मीनाचा पतीच्या आणि बहिणीच्या या नात्याला विरोध होता. तिने पोलिसातही तक्रार केली. मात्र मेहुणी सज्ञान असल्याने या घरगुती प्रकरणात पोलीस काही करु शकले नाही.

रशीदने पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह विहिरीत फेकला. ऑगस्ट 2022 मध्ये पोलिसांना विहिरीत मीनाचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी रशीदने मीनाने काही तणावातून घरातून पळाली आणि विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

मात्र जेव्हा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तेव्हा शवविच्छेदन अहवालात मीनाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला नसून, गळा आवळून तिची हत्या केल्याचे उघड झाले. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने कसून तपास करत आरोपींना अटक केली.