Mumbai Crime : मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना, आई घरी नसल्याचे चिमुरडीसोबत केले ‘हे’ कृत्य

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 10:34 PM

डॉक्टरांचे म्हणणे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर महिलेने थेट वरळी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती देत तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

Mumbai Crime : मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना, आई घरी नसल्याचे चिमुरडीसोबत केले 'हे' कृत्य
मुंबईत 20 महिन्यांच्या मुलीवर अत्याचार
Image Credit source: Social Media

मुंबई : आई घरी नसताना एका 20 महिन्यांच्या बालिकेवर 35 वर्षाच्या शेजाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वरळी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित कुटुंब वरळी परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आई घरी नसताना आरोपीने केले कृत्य

पीडितेचे आईवडिल घरी नसताना संधी साधत शेजारी राहणारा आरोपी घरी गेला आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीचे आई-वडिल घरी आले तेव्हा मुलगी खूप रडत होती. आईने तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुलगी रडतेय आई डॉक्टरकडे घेऊन गेली मग…

डॉक्टरांचे म्हणणे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर महिलेने थेट वरळी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती देत तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून आरोपीला अटक

वरळा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

लातूरमध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लातूर शहरात एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पीडितेच्या तीन मैत्रिणींसह पाच जणांवर लातुरच्या एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

मैत्रिणीने तिला पार्टी करू असं सांगून एका शेतात नेले आणि तिथे तिला गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादवी कलम 376, 338, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करीत पुढील कारवाई सुरू केलेली आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI