मुलांना सांगितले आज असाच झोका खेळायचा, मग जे घडले ते भयंकरच !

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 8:38 PM

पतीने दुसरे लग्न केल्यामुळे मृत महिला शांती देवी ही नैराश्येत होती, अशी माहिती मिळते. मयत 28 वर्षीय शांती ही तिच्या दोन मुलांसोबत झारखंडमध्ये राहत होती. यातील एक मुलगा 12 वर्षांचा तर दुसरा मुलगा 8 वर्षांचा आहे.

मुलांना सांगितले आज असाच झोका खेळायचा, मग जे घडले ते भयंकरच !
नैराश्येतून महिलेने मुलासह जीवन संपवले

पलामू : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. पतीपासून अलिप्त राहणार्‍या महिलेने दोन मुलांसह गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका मुलासह त्या महिलेचा मृत्यू झाला तर एका मुलाने स्वतःचा जीव वाचवण्यात यश मिळवले. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आपल्या दोन मुलांना झोका खेळण्याची बतावणी केली आणि आत्महत्येसाठी तयार केले. हे विदारक सत्य उजेडात आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मानवता आणि मातृत्वाला धक्का देणारी ही घटना आहे. पतीने दुसरा विवाह केल्याने आपले आणि मुलांचे कसे होणार या विवंचनेतून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. महिलेचा पती हा महाराष्ट्रातील पुणे येथे मोलमजुरीचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे महिला होती नैराश्यात

पतीने दुसरे लग्न केल्यामुळे मृत महिला शांती देवी ही नैराश्येत होती, अशी माहिती मिळते. मयत 28 वर्षीय शांती ही तिच्या दोन मुलांसोबत झारखंडमध्ये राहत होती. यातील एक मुलगा 12 वर्षांचा तर दुसरा मुलगा 8 वर्षांचा आहे.

या दोन चिमुरड्यांना शांतीने आपण झोका घेऊ असे सांगितले आणि दोरीचा फास बांधलेल्या ठिकाणी नेले. आईच्या कृत्यावर दोन्ही मुलांना शंका आल्यानंतर त्यांनी विचारणा केली, मात्र आईने आपण वेगळ्या पद्धतीने झोकाच घेत असल्याचे सांगितले. आईच्या बतावणीवर विश्वास ठेवून दोन्ही मुलांनी आपल्या गळ्यात फास घातला. दुर्दैवाने यात महिलेसह एका मुलाचा मृत्यू झाला.

मुलाने आजीला घटनेची माहिती दिली

मनातू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अती सुदूरवर्ती रंगेया गावात ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने स्वतःची सुटका करून जीव वाचवण्यात यशस्वी झालेला महिलेचा मोठा मुलगा रात्रभर दोन मृतदेहांसोबत बसून राहिला. त्यानंतर त्याने आपल्या आजीच्या घरी धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

घरच्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI