बाईकवरुन घरी येत होता, वाटेतच अपघात झाला, 16 महिन्यांनी कोमातून बाहेर येताच जे समोर आलं त्याने पोलिसही हैराण झाले !

बाईकवरुन घरी चाललेल्या तरुणाचा 16 महिन्यांपूर्वी अपघात झाला. या अपघातामुळे तो कोमात गेला. अपघातामुळे आपला मुलगा कोमात गेल्याचे कुटुंबीयांना वाटत होते. मात्र मुलगा कोमातून शुद्धीत येताच मुलाने जे सांगितलं ते ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

बाईकवरुन घरी येत होता, वाटेतच अपघात झाला, 16 महिन्यांनी कोमातून बाहेर येताच जे समोर आलं त्याने पोलिसही हैराण झाले !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पतीवर पत्नीच्या प्रियकराचा हल्ला
Image Credit source: Google
| Updated on: May 01, 2023 | 8:30 PM

मोगा : पंजाबमधील मोगा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटना उघड होताच पोलिसांसह सर्वच जण चक्रावून गेले आहेत. मोगा जिल्ह्यातील मोहाना गावातील एका व्यक्तीचा बाईकवरुन येताना अपघात झाला होता. या अपघातामुळे गंभीर जखमी झाल्याने सदर व्यक्ती कोमात गेला. तब्बल 16 महिन्यांनी कोमात असलेला हा व्यक्ती शुद्धीत आला अन् त्याने जे सांगितले ते ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघातामुळे आपला मुलगा जखमी होऊन कोमात असे घरच्यांना वाटत होते. पण मुलगा कोमातून बाहेर येताच त्याने 16 महिन्यांपूर्वी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि कुटुंबीयांना धक्काच बसला. व्यक्तीच्या जबाबावरुन त्याचा अपघात नसून, घातपात असल्याचे उघड झाले.

रवी सिंह असे सदर व्यक्तीचे नाव आहे. रवीने 16 महिन्यांनंतर कोमातून बाहेर येताच आपल्या पत्नीच्या कटाचे रहस्य उघड केले. अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?

मेहना गावातील रवी सिंह बाईकवरुन आपल्या घरी परतत होते. यावेळी वाटेतच पत्नीचा प्रियकर बहादूर सिंग आणि त्याचा मित्र दीपसिंग यांनी त्याला अडवले. यानंतर दोघांनी रवीला बंद पेट्रोल पंपावर नेले आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रवी बेशुद्ध झाला. यानंतर आरोपींनी त्याच्या घरच्यांना रवीचा अपघात झाल्याचे सांगितले.

यानंतर जखमी रवीच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी मोगा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. रवीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ओसवाल रुग्णालयात रेफर करण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे रवी कोमात गेला. आपला मुलगा रस्ता अपघातात जखमी झाल्याचे नातेवाईक गृहीत धरत होते. जवळपास दीड वर्षानंतर जेव्हा रवी सिंह कोमातून बाहेर आला. यानंतर त्याने पत्नी रिम्पी कौरची सर्व गुपिते सर्वांसमोर उघड केली.

रवीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करत एकाला अटक

रवीच्या पत्नीचे बर्नाला जिल्ह्यातील रहिवासी बहादूर सिंग याच्याशी अनैतिक संबंध होते. रवीचा या संबंधावा विरोध होता. यामुळेच पत्नी रिम्पीने प्रियकराशी संगनमत करुन त्याच्या हत्येचा कट रचला. मेहना पोलिसांनी रवी सिंगच्या जबाबावरुन पत्नी रिम्पी कौर, तिचा भाऊ दीप सिंग आणि प्रियकर बहादूर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दीप सिंगला अटक केली असून, रिम्पी कौर आणि तिचा प्रियकर बहादूर सिंग फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.