लग्नात रसगुल्ल्याचा वाद टोकाला गेला, वऱ्हाड्यांनी नवरीच्या काकालाच संपवला !

लग्न मुहूर्तावर पार पडले आणि वधू-वर एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. त्यानंतर भोजन समारंभही आटोपत आला होता. यादरम्यान लग्नमंडपातील रसगुल्ल्याची बादली दोघे तरुण पळवून नेत असल्याचे वधूच्या काकांच्या लक्षात आले.

लग्नात रसगुल्ल्याचा वाद टोकाला गेला, वऱ्हाड्यांनी नवरीच्या काकालाच संपवला !
रसगुल्ल्यावरुन लग्नात हाणामारीत एकाचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 6:13 PM

लखनौ : सध्या सर्वत्र लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात झालेल्या एका लग्न सोहळ्यामध्ये आनंदावर विरजण पडले आणि घडलेल्या हत्याकांडाने लग्न सोहळ्यावर शोककळा पसरली. दोन तरुण लग्न मंडपातून रसगुल्ल्याची बादली घेऊन पळत होते, त्यावेळी वधूच्या काकाने त्यांना रोखले. त्यावरुन वाद होऊन त्याचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या वधूच्या काकाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. भर लग्न मंडपात झालेल्या या राड्याने मैनपूर परिसरात खळबळ उडाली आहे. कुरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकापूर गावात ही घटना घडली. या घटनेचा स्थानिक पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

वधूच्या काकाची वऱ्हाडातील अनेकांनी केली धुलाई

लग्न मुहूर्तावर पार पडले आणि वधू-वर एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. त्यानंतर भोजन समारंभही आटोपत आला होता. यादरम्यान लग्नमंडपातील रसगुल्ल्याची बादली दोघे तरुण पळवून नेत असल्याचे वधूच्या काकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पुढे होऊन त्या दोघांना रोखले आणि बादली मंडपातून बाहेर घेऊन न जाण्याची तंबी दिली.

सर्वांसमोर अपमान केल्याने तरुण संतापले

सर्वांदेखत आपला अपमान झाला, या रागाने ते दोन तरुण संतापले. त्यांनी स्वतःची चूक मान्य न करता उलट वधूच्या काकाला बेदम मारहाण सुरू केली. विशेष म्हणजे हा वाद सुरू असताना त्यामागील कारण काय याचा अंदाज न घेताच वऱ्हाडातील इतर मंडळींनीही वधूच्या काकाची धुलाई केली. त्यात गंभीर दुखापत होऊन वधूच्या काकाचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

रणवीर सिंह असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते आपला मेहुणा रामकिशोरसोबत साडूच्या मुलीच्या लग्नाला हजर राहिले होते. रणवीर आणि रामकिशोर या दोघांनी लग्न मंडपामध्ये ज्या दोन तरुणांवर चोरीचा संशय घेतला, ते तरुण गावातीलच रहिवासी होते. त्यामुळे लग्न मंडपात वाद झाल्यानंतर अजय आणि रजत या दोन तरुणांच्या बाजूने गावकरी उभे राहिले.

वाद वाढत गेल्यानंतर तरुणांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या गावकऱ्यांनी वधूच्या काकाला बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या रामकिशोरवर सैफई येथील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.